बाया डिझाईनमध्ये पर्स, कपडे आणि बरेच काही..
महिला दिनानिमित्ताने बाया डिझाईनने फोल्क आर्ट आणि होम डेकोरचा समन्वय साधत विशेष उत्पादने सादर केली आहेत. महिलांना आकर्षण असलेल्या पर्स, कपडे आदींचे प्रदर्शन महिला दिनापासून १६ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. लोअर परेल येथील रघुवंशी मिल परिसरातील बाया डिझाईनच्या दालनात अशा अनेक वस्तू खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे.
 आकर्षक चकाकते
प्लॅटिनम दागिने
महिलांचा विशेष दिन असलेल्या ८ मार्च रोजीपासून विविध आकार, धातूंमधील दागिने कॅरेटलेनडॉटकॉमवर उपलब्ध झाले आहेत. यामध्ये प्लॅटिनम क्लासिक, प्लॅटिनम दागिने यांचा समावेश आहे. विविध आकार, धातू आणि रत्ने यांचा समावेश यामध्ये आहे. २० हजार रुपयांपासून कानातले तर ३० हजार रुपयांपुढील चेन तसेच बांगडय़ा, ब्रेसलेट, नेकलेसही आहेत. मौल्यवान धातूंचा समावेश असलेले विविध आकारातील नेकलेस हे एक लाख रुपयांपुढील रकमेत उपलब्ध आहेत. टीबीझेड दालनांतील दागिनेही येथे उपलब्ध आहेत. दिती, मनुभाई ज्वेलर्स या दालनांमधील दागिन्यांची श्रेणीही या व्यासपीठावर पहायला मिळते.

Story img Loader