निव्हिया नाविन्यता
त्वचा निगेतील अग्रेसर जागतिक ब्रॅण्ड निव्हियाने आपल्या टोटल फेस क्लीनअप उत्पादनासाठी अभिनेत्री परिणीती चोप्राला करारबद्ध केले असून, नाविन्यपूर्ण डिजिटल प्रसारमोहिम सुरू केली आहे. http://www.just5mins.in या लघुसंकेतस्थळाद्वारे केवळ पाच
मिनिटात या उत्पादनाचे पाच उपकारक
लहानग्यांमध्ये लोकप्रिय ठरलेला कार्ड गेम ‘क्रिकेट अॅटॅक्स’ आयपीएल क्रिकेटच्या ताज्या हंगामासह अद्ययावत होऊन नव्या रूपात दाखल झाला आहे. टॉप्स इंडिया स्पोर्ट्स अॅण्ड एंटरटेन्मेंट कंपनीने आणलेल्या ‘क्रिकेट अॅटॅक्स २०१३ पॅक्स’मध्ये सध्याच्या संघरचनेसह सर्व सुपरस्टार खेळाडू त्यांच्या नव्या गुण-मानांकनासह दाखल झाले आहेत. विविध सहा भाग असलेले हे संपूर्ण कलेक्शन रु. २० ते रु.
९९९ या किंमत फरकात देशभरात निवडक विक्रेत्यांकडे उपलब्ध झाले आहे.
‘इफेलो डॉट कॉम’ची उन्हाळी रंगावली
फॅशनच्या क्षेत्रातील सर्वात मोठे ऑनलाइन दालन इफेलो डॉट कॉम (efello.com) स्त्रीवर्गाकडून वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक पेहराव आणि साडय़ांचे खास उन्हाळी संग्रहाचे दालन प्रस्तुत केले आहे. ही वस्त्रे म्हणजे उन्हाळ्यात उल्हासी अनुभूती देणाऱ्या रंगांची मनोहारी उधळण म्हणता येईल. साधी सूती किंवा शिफॉन साडीही या दालनात उपलब्ध आहे, तसेच झरदोसी, गोल्ड प्रिंटेड आणि लेसचे काम केलेल्या साडय़ाही पाहता येतील. डिझायनर ते पारंपरिक प्रकारात निवडीच्या विस्तृत संधी असलेल्या या दालनातील वस्त्रे रु. ४००० पासून पुढील किमतीत उपलब्ध आहेत.
‘स्कॉटिश यार्ड्स’चे समर कलेक्शन
उच्च दर्जा व उत्तम दर्जाच्या कापडाचा लौकिक असलेल्या ‘स्कॉटिश यार्ड्स’ या सूट, ट्राऊजर्स आणि डिझाइनर शर्ट्सच्या ब्रॅण्डचे निर्माते मुंबईस्थित दिशांक सिन्थेटिक्स (प्रा.) लिमिटेडने तारापूर येथे आपला अद्ययावत विणकाम (निटिंग) प्रकल्पाचे विस्तारीकरण पूर्ण केल्याची घोषणा केली आहे. यातून कंपनी वस्त्रोद्योग क्षेत्रातील एकात्मिक कंपनी म्हणून स्थान कमावले असून, प्रतिवर्ष ५० टक्के दराने वृद्धीही तिला साधता येईल, असे तिचे व्यवस्थापक संजय बगाडिया आणि विवेकानंद बगाडिया या बंधूंनी स्पष्ट केले. कंपनीने अलीकडेच तीन नवीन सब-ब्रॅण्ड्स अंतर्गत आपले समर कलेक्शन बाजारात दाखल केले आहे. खास प्रीमियम शर्टिगसाठी ‘व्हाइट कॉलर’, फॅशनेबल इम्पोर्टेड फॅब्रिकचे ‘चार्ली कूपर वर्ल्ड’ आणि उंची लिनेन आणि लिनेन ब्लेंडसाठी ‘दी लिनेन स्ट्रीट’ असे हे तीन ब्रॅण्ड्स आहेत. सध्या कंपनीची उत्पादने देशभरात १००० किरकोळ विक्रीदालनांमध्ये उपलब्ध असून, त्यातील मुंबईतील १२५ दालनांचा समावेश आहे.
स्त्रियांसाठी स्लिम फिट जीन्स
‘बी फिट, बी कॉन्फिडन्ट’ असे ब्रीद असलेल्या रँगलरने आपल्या ट्रू फॉर्म जीन्सची श्रेणी खास महिलांसाठी प्रस्तुत केली आहे. ट्रू फॉर्म जीन्स या विशेष पॉवर स्ट्रेच फॅब्रिकपासून घडविल्या गेल्या असल्याने स्टायलिश स्लिम फिटसाठी त्या उत्तम ठरतात. या जीन्स वापरकर्त्यां महिलांना परफेक्ट फिटची अनुभूती देण्याबरोबरच आरामदायीही बनल्या आहेत.
जे हॅम्पस्टिडची नवीन श्रेणी
सियाराम सिल्क मिल्सचा ब्रॅण्ड असलेल्या जे. हॅम्पस्टिडने अभिनेता व राजदूत ऋतिक रोशनच्या साहाय्याने तयार वस्त्र प्रावरणांची नवी शृंखला सादर केली आहे. यामध्ये पुरुष वर्गासाठी फॅब्रिक प्रकारातील आणि विविध रंगसंगतीतील शर्ट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. फॉर्मल प्रकारातील शीत रंगातील तयार शर्टही यात समाविष्ट आहेत. सियाराम्स शॉप तसेच रिलायन्स ट्रेन्ड आदी दालनांमध्ये हे शर्ट उपलब्ध आहेत.
ग्राहकनिष्ठेची ‘क्लब उनो’ पावती
आपल्या ग्राहकांसाठी विशेष निष्ठा पुरस्काराचा उपक्रम मालाडस्थित ओबेरॉय मॉलने आपल्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त सुरू केला आहे. ‘क्लब उनो’ असे नामाभिधान दिलेल्या गेलेल्या या कार्यक्रमात मॉलमधील नियमित ग्राहक तेथील खरेदी अनुभवाला अधिक लाभकारक बनवू शकतील. मॉलच्या कोणत्याही स्टोअरमधील १०० रुपयांच्या खरेदीवर एक गुण आणि अशा संचयित गुणांच्या मोबदल्यात अनेकानेक बक्षिसे ग्राहक जिंकू शकतील.
हिमालयाचे आरोग्यवर्धक पेय
हिमालया हर्बल हेल्थकेअरने आरोग्यवर्धक पेय बाजारात आणले आहे. हायओवना नावाने सादर करण्यात आलेले हे पेय १८ वर्षांवरील व्यक्तींसाठीच आहे. यामध्ये प्रोटीन तसेच न्युट्रिनचा अंश आहे. मनुष्याच्या तणावपूर्ण जीवनशैलीत हे पेय शरीर उत्साहवर्धक राखण्यासाठी उपकारक ठरत असल्याचा दावा करण्यात आला आहे. चॉकलेट आणि व्हॅनिला चवींमधील या पेयाची किंमत १९० रुपये आहे. सर्व औषध दुकानांसह हिमालयाच्या विशेष दालनांमध्ये ते विक्रीसाठी उपलब्ध आहे.
नोमार्कस्ची त्वचेसाठी हर्बल क्रीम
त्वचेवरील विविध प्रकारचे डाग घालविण्यासाठी पसंतीचे असलेल्या नोमार्कस्ने हर्बल प्रकारातील नवी क्रिम बाजारात आणली आहे. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी तसेच दैनंदिन वापरासाठी उपयुक्त या क्रिममध्ये सर्व नैसर्गिक गुणधर्माचा समावेश करण्यात आला आहे. तीव्र सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण करण्यास ही क्रीम उपयुक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. टर्मरिक, ऑले विरा, व्हिट जर्म तेल, लेमन तेल, सॅन्डल वूड तेल, नीम आणि कॅलेन्डुलाचा यात अंश आहे. १२ ग्रॅम क्रीमची किंमत ४० रुपये तर २५ ग्रॅमच्या क्रिमची किंमत ७० रुपये आहे.
किफायती कलर-स्क्रीन फोन
जवळपास १० कोटींच्या विक्रीचा पल्ला गाठणाऱ्या नोकिया १२८० हँडसेट्सच्या यशोशिखरानंतर नोकियाने त्याच धाटणीचा ‘नोकिया १०५’ ही हँडसेट्सची श्रेणी दाखल केली आहे. अवघ्या रु. १२४९ किमतीला उपलब्ध झालेला हा आजच्या घडीला सर्वात किफायती कलर स्क्रीन फोन आहे. पहिल्यांदाच मोबाईल फोन वापरणाऱ्यांसाठी उपयुक्त या हँडसेटमध्ये एफएम रेडियो, पाच प्री-लोडेड गेम्स, बोलके घडय़ाळ, फ्लॅशलाइट ही वैशिष्टय़े असण्याबरोबरच, नोकियाच्या सेवा जाळ्याशी संलग्नताही मिळेल.
लाईमरोड.कॉमवर आकर्षक पादत्राणे
प्रसिद्ध ई-व्यापार मंच असलेल्या लाईमरोड.कॉमवर आकर्षक पादत्राणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पुरुष तसेच महिला वर्गासाठी असलेली ही पादत्राणे विविध रंग आणि डिझाइनमध्ये सादर करण्यात आली आहेत. यामध्ये सोलो वोगा, काल्टरेन, कॅटवॉक, ट्रेसमोड आणि स्केचेर्ससारखे ब्रॅण्ड असून त्यांच्या किमती ४९९ रुपयांपासून पुढे आहेत.