जपानच्या सोनी कंपनीने एक्सपेरिया श्रेणीतील नवा झेड हा मोबाईल हँडसेट बुधवारी सादर केला. अभिनेत्री कतरिना कैफच्या हस्ते त्याचे अनावरण दिल्लीत झाले. एकूणच एक्सपेरिया श्रेणीतील मोबाईलसाठी तिची राजदूत म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे. एप्रिलपासून उपलब्ध होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील एक्सपेरियासह ही श्रेणी नव्या आर्थिक वर्षांत ३,५०० कोटी रुपयांचा महसूल मिळवेल, असा कंपनीचा आशावाद आहे. नव्या मोबाईलच्या आक्रमक विपणन मोहिमेसाठी कंपनीने ३०० कोटींची तरतूदही केली आहे. कंपनीचा ४जी तंत्रज्ञानावरील एक्सपेरिया टॅब्लेट झेडही मे महिन्यात येऊ घातला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in