पंतप्रधानांची दिवाळी भेट * तीन सुवर्ण योजनांचा शुभारंभ
सोन्यामार्फत गुंतवणूक आणि सांस्कृतिक मूल्य जपण्यासाठी आग्रही असणाऱ्या महिलांचे खऱ्या अर्थाने सुवर्ण मुद्रणीकरण योजनेमार्फत सबलीकरण होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.
ऐन दिवाळीच्या तोंडावर सोने बचतीच्या तीन योजनांचा शुभारंभ करताना पंतप्रधानांनी या योजनेच्या संकेतस्थळाचेही उद्घाटन केले. तसेच योजनेच्या पहिल्या सहा लाभार्थीना गुंतवणूक प्रमाणपत्र देऊन त्यांनी गौरविले. अर्थमंत्री अरुण जेटली, अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा, वाणिज्य व उद्योगमंत्री निर्मला सीतारामन आदी या वेळी उपस्थित होते.
भारताला सुवर्णकाळाकडे घेऊन जाणाऱ्या या योजनेतून लाभ मिळविण्याची सुवर्णसंधी गुंतवणूकदारांनी साधावी, असे आवाहनही त्यांनी केले. दिवाळी सणाच्या पाश्र्वभूमीवर सादर झालेल्या या योजनांचे वर्णन पंतप्रधानांनी ‘सोने पे सुहागा’ असे केले. योजनांमधील गुंतवणुकीद्वारे अधिक परतावा मिळवणारे लाभार्थी हेच खऱ्या अर्थाने या योजनेचे विक्री प्रतिनिधी (एजंट) ठरतील. घराघरांमध्ये हजारो टन सोने असूनही भारतीय गरीबच राहिला आहे; तेव्हा याच सोन्याच्या जोरावर त्याला नव्या योजनेत सहभागी होऊन गरिबीचा शिक्का पुसता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हौस अथवा गुंतवणूक म्हणून घराघरात असलेल्या सोन्याचा अंदाज हा २०,००० कोटी टनचा असून त्याचे आजचे मूल्य ८०० अब्ज डॉलर – म्हणजेच ५२ लाख कोटी रुपये आहे. भारत वर्षांला सरासरी १,००० टन सोने आयात करतो. देशातील सर्वात मोठा सोने खरेदीदार म्हणून भारताने नुकतेच चीनलाही मागे टाकले आहे. चीनच्या ५४८ टनच्या तुलनेत देशाने खरेदी केलेल्या सोन्याचे प्रमाण ५६२ टन राहिले आहे.
२०१५-१६ च्या अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेली ‘सुवर्ण मुद्रीकरण’ ही योजना १५ वर्षांसाठी सुरू राहणार आहे. गुंतवणूकदारांकडून घेतलेल्या सोन्याचा बँकांना लिलाव करता येईल, तसेच ते जवाहिऱ्यांना कर्ज म्हणूनही देता येईल. गुंतवणूकदारांना अशा सोन्यावर बँकांकडून निश्चित कालावधीकरिता ठरावीक व्याज मिळेल. यासाठी सोने वजनावर मर्यादाही आहेत. योजनेसाठी गुंतवणूकदारांना पॅन, केवायसी बंधनकारक असेल.

सुवर्ण मुद्रणीकरण योजनेतील गुंतवणुकीवर भांडवली लाभ, संपत्ती तसेच प्राप्तिकर लागणार नाही, ही एक दिलाशाची बाब ठरणार आहे. गुंतवणूक तसेच त्यावर मिळणारे व्याज हे पूर्णत: करमुक्त असेल, असे ही योजना सादर करताना स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र सार्वभौम सुवर्ण रोख्यांबाबत मौल्यवान धातूप्रमाणे आकारल्या जाणाऱ्या भांडवली नफ्यावरील कर येथेही लागू असेल.
देशात प्रथमच असित्वात आलेल्या सार्वभौम सुवर्ण रोख्यांवर गुंतवणूकदारांना मौल्यवान धातूच्या वजन व मूल्याच्या प्रमाणात परतावा दिला जाईल.
यासाठी मर्यादित कालावधी व वार्षिक व्याजाचे बंधन असून यातून बाहेर पडण्याचा मार्गही ठरावीक कालावधीनंतर खुला असेल. सध्या सोन्याशी निगडित बाजारात अस्तित्वात असलेल्या योजनांच्या तुलनेत या योजनांमधील परतावा अधिक असल्याचे मानले जाते.

*. सुवर्ण नाणे आणि मुद्रा
भारतीय बनावटीची सोन्याच्या शुद्धतेबाबत प्रमाणित सुवर्ण नाणी आणि मुद्राही प्रथमच सादर करण्यात आली आहेत. ५ व १० ग्रॅम वजनाची ही नाणी असून लवकरच २० ग्रॅममध्येही ती उपलब्ध होतील. भारतात तयार करण्यात आलेल्या या सुवर्ण नाण्यांवर एका बाजूला अशोकचक्र तर दुसऱ्या बाजूला महात्मा गांधी यांचे चित्र असेल.

* देशातील विनावापर पडून असलेले सोने या योजनेमार्फत व्यवहारात येणार असून त्यामुळे अप्रत्यक्षपणे भारताच्या आर्थिक विकासवाढीला बळ मिळेल. मौल्यवान धातूच्या वाढत्या आयातीमुळे सरकारच्या तिजोरीवरील त्याचप्रमाणे चालू खात्यावरील तुटीचा भार या योजनांमुळे निश्चितच कमी होईल. सरकारकडून पडलेले हे योग्य पाऊल आहे.
ए. दिदारसिंग ,‘फिक्की’चे महासंचालक

* भारतीय सुवर्ण उद्योगासाठी या योजना एक आमूलाग्र परिवर्तन घेऊन येतील. या योजनेबाबत असलेल्या गुंतवणूकदारांच्या अपेक्षांची पूर्तता लगोलग होईल असे नाही. पण जसजशा पायाभूत रचनेत विस्तारल्या जाऊन, योजनांची व्याप्तीही वाढेल, तसे गुंतवणूकदारांमध्ये विश्वास संपादित केला जाईल. पण त्यासाठी काही वेळ द्यावा लागेल.
सोमसुंदरम पीआर , संचालक, जागतिक सुवर्ण परिषद