प्राप्तीकर विवरणपत्र स्वीकारण्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील प्रत्यक्ष कर भवन येथे विशेष खिडक्या सुरू करण्यात आल्या असून त्या येत्या ३१ जुलैपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सुरू राहतील. महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच अपंगांसाठी येथे विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे.
प्राप्तीकर विवरणपत्र अल्प किंमतीमध्ये तयार करून दाखल करण्यासाठी करदाता, प्राप्तीकर विभागाने प्रमाणित केलेल्या ‘टॅक्स रिटर्न प्रिपेअर्स’चे (टीआरपीएस) सहकार्य घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावरून योग्य अर्ज निवडून यासाठीचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करणे गरजेचे आहे. डिजिटल स्वाक्षरी नसल्यास आयटीआय-५ अर्जाच्या छापील प्रतिवर स्वाक्षरी करून ती टपालाद्वारे पाठविण्याचीही सोय आहे. १८००४२५०००२५ या मदत क्रमांकावर करदात्यांना ऑनलाईन माहितीही मिळेल.वार्षिक पाच लाख उत्पन्न असणाऱ्या नोकरदारांसाठी यंदाच्या वर्षांपासून विवरणपत्र भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी दोन वर्षे याबाबत सूट दिली जात होती.

Story img Loader