देशातील सर्वात मोठी बँकअसलेल्या स्टेट बँकेने २०१३-१४ या आíथक वर्षांच्या चौथ्या तिमाहीचे व संपूर्ण आíथक वर्षांचे लेखापरीक्षित निकाल शुक्रवारी जाहीर केले. मागील तिमाहीच्या तुलनेत ७.८ टक्के घट होऊन बँकेचा नफा ३,२९९ कोटींवरून ३,०४१ कोटी रुपये झाला आहे. सुधारत असलेली अर्थव्यवस्था व बँकेने मोठय़ा प्रमाणात केलेली ‘एनपीए’ अर्थात अनुत्पादित कर्जाची पुनर्रचना यामुळे एकूण कर्जाच्या तुलनेत अनुत्पादित कर्जाचे प्रमाण घटून ४.९५ टक्के झाले आहे.
सप्टेंबर ते डिसेंबर २०१३ या आधीच्या तिमाहीच्या तुलनेत जानेवारी-मार्च २०१४ या तिमाहीत बँकेच्या पुनर्रचित कर्जाची मात्रा घटून ११,४०० कोटींवरून ७,९४७ कोटी रु. झाली आहे. तिमाहीत बँकेने ३५,८५७ कोटींचे निव्वळ व्याजापोटी उत्पन्न मिळविले आहे. मागील तिमाहीत बँकेला ३४,८५३ कोटी व्याजाचे उत्पन्न मिळाले होते.
तर बँकेने संपूर्ण आíथक वर्षांत १०,८९१ कोटींचा नफा कमावला आहे. मागील आíथक वर्षांत बँकेने १४,१०४ कोटींचा नफा मिळविला होता.
भारतीय बँक महासंघाच्या माध्यमातून बँकेच्या कर्मचारी संघटनांबरोबर वेतनवाढीच्या वाटाघाटी सुरू आहेत. कर्मचाऱ्यांना वेतनवाढीच्या संभाव्य थकबाकीपोटी द्याव्या लागणाऱ्या रकमेची तरतूद म्हणून १,८१४ कोटी, तर ग्रॅच्युइटीपोटी बँकेने २०० कोटींच्या केलेल्या तरतुदीचा या तिमाही निकालांवर प्रभाव दिसून येतो. ग्रॅच्युइटीपोटी देय असलेल्या रकमेची पूर्तता या वर्षांपासून पुढील पाच वर्षांत करण्याचे आदेश रिझव्‍‌र्ह बँकेने सर्व बँकांना दिले आहेत. मागील वर्षी संभाव्य कर्मचारी वेतनवाढ थकबाकीपोटी बँकेने ७२० कोटींची तरतूद केली होती.
बँकेच्या पर्याप्त भांडवलाचे ३१ मार्च २०१४ रोजी प्रमाण बॅसल-२ दंडकानुसार १२.९६ टक्के, तर बॅसल-३ नुसार १२.४४ टक्के आहे.
समभागाची १० टक्क्यांनी उसळी
निकालाआधीच उत्साहाचे भरते आलेल्या स्टेट बँकेच्या समभागाने निकाल जाहीर होताच पाच टक्क्यांहून अधिक उसळी घेत २,७७५ रुपये या वार्षकि उच्चांकाला स्पर्श केला. बाजार बंद होतेसमयी समभागाने गुरुवारच्या बंद भावाच्या तुलनेत २४३.४५ रुपयांची कमाई करीत म्हणजे ९.६७ टक्क्यांनी वधारून २,७५५.२५ वर बंद झाला. भागधारकांसाठी आणखी एक चांगली बातमी म्हणजे बँकेने २०१३-१४ वर्षांसाठी ३०० टक्के अंतिम लाभांशाची घोषणा केली असून त्यापकी १५० टक्के लाभांशाचे तिने यापूर्वी वाटप केले आहे.

Story img Loader