विलीनीकरण घोषणा
स्टेट बँकेच्या पाच सहयोगी बँकांचे प्रमुख अशा पालक बँकेतील विलीनीकरणाचे स्वागत बुधवारीही कायम राहिले. स्टेट बँकेसह बाजारात सूचिबद्ध असलेल्या दोन सहयोगी बँकांचे मूल्य सलग दुसऱ्या सत्रात उंचावले.
बाजार व्यवहारादरम्यानच्या विलीनीकरण घोषणेनंतर मंगळवारीही बाजारात सूचिबद्ध असलेल्या तीनपैकी दोन सहयोगी बँकांचे समभाग मूल्य तब्बल १३ टक्क्यांपर्यंत वाढले होते.
स्टेट बँक ऑफ म्हैसूरचा समभाग ९.४४ टक्क्यांनी वाढला. स्टेट बँक ऑफ त्रावणकोरचे मूल्य २.३७ टक्क्यांनी वाढले, तर व्यवहारात ४.५२ टक्क्यांपर्यंत झेपावल्यानंतर स्टेट बँक ऑफ बिकानेर अॅण्ड जयपूरला दिवसअखेर मात्र २.९० टक्के घसरणीला सामोरे जावे लागले.
तर सर्वाधिक तोटय़ाची नोंद करूनही सार्वजनिक पंजाब नॅशनल बँकेचा समभाग सत्रअखेर मात्र ३.२५ टक्क्यांनी वाढला. त्याला व्यवहार संपताना ७६.२० रुपयांचे मूल्य मिळाले. व्यवहारात तो ४.६० टक्क्यांपर्यंत वाढला होता.
बँक समभागांना प्रतिसाद :
एस अॅण्ड पी बीएसई बँकेक्स : १९,०५८.९४ ३ ०.१०%
’ स्टेट बँक रु. १८०.२० २ १.७८%
’ स्टेट बँक ऑफ म्हैसूर रु. ४६७.०० २ ९.४४%
’ स्टेट बँक ऑफ त्रावणकोर रु. ४०८.५५ २ २.३७%
’ स्टेट बँक ऑफ बिकानेर अॅण्ड जयपूर रु. ४९४.२० ३ २.९०%
’ पंजाब नॅशनल बँक : रु. ७६.२० २ ३.२५%