तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून पुढील आठवडय़ातील निर्देशांकांची आणि प्रमुख समभागांची संभाव्य वाटचाल..

शुक्रवारी भांडवली बाजार ज्या रीतीने कोसळला त्यावरून गेल्या आठवडय़ापर्यंत तेजीचे अंतिम पर्व चालू होते हे सिद्ध झाले आणि ज्या वाचकांनी गेल्या आठवडय़ातील या स्तंभातील हेच सूचित करणारा लेख वाचून आपले समभाग नफ्यात विकले ते आज समाधानी असतील. या पाश्र्वभूमीवर पुढील आठवडा कसा असेल त्याचा आढावा घेऊया.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

शुक्रवारचा बंद भाव : सेन्सेक्स ३१,९२२.४४  निफ्टी ९,९६४.४०

सध्या चालू असलेल्या तेजीचा कणा हा ३१,७०० / ९,९५० आहे, हे गेल्या आठवडय़ातील लेखातील महत्त्वाचे वाक्य होते. या आठवडय़ाचा सप्ताहअखेर बंद त्या पातळीजवळच आहे. त्यामुळे पुढील आठवडय़ात थोडी आणखी घसरण ही ३१,५५०/ ९,८५० ते ९,९०० पर्यंत होऊन हलकीशी सुधारणा ३२,२०० /१०,००० ते १०,०५० पर्यंत होईल. तेजीच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वाची ‘कल निर्धारण पातळी’ असेल या स्तरावरच शाश्वत तेजी सुरू होईल, अन्यथा ३२,२००/ १०,०५० च्या स्तरावर निर्देशांकाला टिकण्यास अपयश येत असेल तर निर्देशांक फिरून ३१,४००/ ९,७५० व नंतर ३१,०००/९,५५० पर्यंत खाली घसरू शकतो.

सोने किमतीचा आढावा :

यापूर्वी २ सप्टेंबरच्या लेखात भाकीत केलेले रु. ३०,२०० चे वरचे इच्छित उद्दिष्ट ८ सप्टेंबरला साध्य झाले. सोन्याच्या किमतीचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रु. २९,५०० ते ३०,५०० असा असेल. येणाऱ्या दिवसातील सणासुदीचे दिवस व उत्तर कोरिया – अमेरिका युद्धज्वर लक्षात घेता सोने तेजाळलेलेच राहील.  (सोन्याचे भाव ‘एमसीएक्स’वरील सौद्यांवर आधारित)

लक्षवेधी समभाग..

टाटा कम्युनिकेशन लि.

शुक्रवारचा भाव : रु.६८०.३५ 

टाटा कम्युनिकेशनचा आजचा बाजारभाव हा १०० (६८०), ५० (६५८), २० (६७५) या सर्व दिवसांच्या चलत् सरासरीवर बेतलेला बाजारभाव आहे.

समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा रु. ६७० ते ७३० असा आहे. रु. ७३० च्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन रु. ७७५ ते ८०० हे प्रथम वरचे उद्दिष्ट व नंतर रु. ९०० हे दुसरे वरचे उद्दिष्ट असेल. गुंतवणूकयोग्य रक्कम २५ टक्क्यांच्या चार तुकडय़ांत विभागून प्रत्येक घसरणीत हा समभाग खरेदी करावा. या दीर्घकालीन गुंतवणुकीला रु. ६५०चा स्टॉप लॉस ठेवावा.

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी स्टॉप लॉस व इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

आशीष अरिवद ठाकूर – ashishthakur1966@gmail.com

 

Story img Loader