किरकोळ अंशांची घसरण नोंदवत मुंबई शेअर बाजाराने शुक्रवारी तिसरी सप्ताह घट राखली. सलग तिसऱ्या सत्रात नकारात्मक प्रवास करताना सेन्सेक्स सप्ताहअखेर ११.६६ अंश घसरणीसह २०,२१७.३९ वर येऊन ठेपला. सेन्सेक्स आता आठवडय़ाच्या नीचांक टप्प्यावर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतदेखील आठवडाअखेरच्या व्यवहारात ३.६० अंश घसरणीसह ५,९९५.४५ पर्यंत खाली आला.
गेल्या दोन व्यवहारांत मोठय़ा घसरणीसह सेन्सेक्स एकूण ६६१.७७ अंशाने कोसळला आहे. गुरुवारच्या व्यवहारात तर त्यात ४००हून अधिक अंशांची आपटी येत सेन्सेक्स जवळपास तीन महिन्यांतील मोठी घसरण नोंदविता झाला होता. शुक्रवारच्या व्यवहारातही सेन्सेक्स १५० अंशांनी खाली आल्यानंतर दिवसअखेर काहीसा सावरत मात्र घसरणीसहच बंद झाला.
दरम्यान, परकी चलन व्यवहारात रुपया शुक्रवारी सलग दोन दिवसांच्या घसरणीतून सावरला. डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन सप्ताहअखेर ६ पैशांनी वधारत ६२.८७ पर्यंत उंचावले. गेल्या सलग दोन दिवसांत घसरणाऱ्या रुपयाने या कालावधीत ५७ पैशांची आपटी खाल्ली आहे.
सेन्सेक्सची साप्ताहिक घसरणीची हॅट्ट्रिक
किरकोळ अंशांची घसरण नोंदवत मुंबई शेअर बाजाराने शुक्रवारी तिसरी सप्ताह घट राखली. सलग तिसऱ्या सत्रात नकारात्मक प्रवास करताना सेन्सेक्स सप्ताहअखेर ११.६६ अंश घसरणीसह २०,२१७.३९ वर येऊन ठेपला.
First published on: 23-11-2013 at 12:24 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stock market bse sensex posts 3rd weekly loss on uncertainty over us fed tapering