मुंबई : जागतिक बाजारातील संमिश्र कल आणि गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीकडे पाठ फिरवल्याने गेल्या चार सत्रांतील तेजीची मालिका बुधवारी खंडित झाली. शिवाय निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या भारती एअरटेलच्या समभागात मोठय़ा घसरणीने एकंदर निर्देशांकाच्या वाढीला मुरड घालण्यास हातभार लावला.

देशांतर्गत आघाडीवर गुरुवारी रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण समितीची मध्यावधी बैठक पार पडणार आहे. शिवाय जागतिक पातळीवर अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हच्या बैठकीच्या बुधवारी मध्यरात्री (भारतीय प्रमाणवेळेनुसार) अपेक्षित व्याजदराच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा अवलंबला. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत मंगळवारच्या सत्रात सावरलेल्या रुपयाचे मूल्य बुधवारच्या सत्रात पुन्हा गडगल्याने बाजारात निराशेचे वातावरण राहिले.

77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६१,००० अंशांची पातळी टिकवून ठेवण्यास अपयशी ठरला आणि २१५.२६ अंशांच्या घसरणीसह ६०,९०६.०९ पातळीवर बंद झाला. दिवसभरात ३२६.९६ अंश गमावत त्याने ६०,७९४.३९ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकाने मात्र १८ हजारांच्या वर तग धरला. ६२.५५ अंशांच्या घसरणीसह तो दिवसाअंती १८,०८२.८५ पातळीवर स्थिरावला.

सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांमध्ये भारती एअरटेलच्या समभागात ३.०५ टक्क्यांची घसरण झाली. त्यापाठोपाठ मारुती, हिंदूस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजी, इंडसइंड बँक आणि टायटनचे समभाग पिछाडीवर होते. दुसरीकडे, सन फार्मा, आयटीसी, टेक मिहद्र, डॉ. रेड्डीज आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग मात्र वधारले होते. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मंगळवारी २,६०९.९४ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.

अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या पतधोरण समितीकडून लवकरच सुधारित व्याजदर निश्चित केले जाणार आहेत. त्या परिणामी गुंतवणूकदारांनी देशांतर्गत बाजारात नफावसुलीला प्राधान्य दिले. मात्र अमेरिकेतील रोजगारासंबंधी सकारात्मक आकडेवारीमुळे व्याज दरवाढीचा वेग कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र बाजाराने आधीपासून ७५ आधारिबदूंची व्याज दरवाढ गृहीत धरली आहे. मात्र प्रत्यक्ष घोषणेनंतर बाजाराची पुढील वाटचाल निश्चित होईल, असे मत  जिओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

Story img Loader