मुंबई : जागतिक बाजारातील संमिश्र कल आणि गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीकडे पाठ फिरवल्याने गेल्या चार सत्रांतील तेजीची मालिका बुधवारी खंडित झाली. शिवाय निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या भारती एअरटेलच्या समभागात मोठय़ा घसरणीने एकंदर निर्देशांकाच्या वाढीला मुरड घालण्यास हातभार लावला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
देशांतर्गत आघाडीवर गुरुवारी रिझव्र्ह बँकेच्या पतधोरण समितीची मध्यावधी बैठक पार पडणार आहे. शिवाय जागतिक पातळीवर अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्र्हच्या बैठकीच्या बुधवारी मध्यरात्री (भारतीय प्रमाणवेळेनुसार) अपेक्षित व्याजदराच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा अवलंबला. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत मंगळवारच्या सत्रात सावरलेल्या रुपयाचे मूल्य बुधवारच्या सत्रात पुन्हा गडगल्याने बाजारात निराशेचे वातावरण राहिले.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६१,००० अंशांची पातळी टिकवून ठेवण्यास अपयशी ठरला आणि २१५.२६ अंशांच्या घसरणीसह ६०,९०६.०९ पातळीवर बंद झाला. दिवसभरात ३२६.९६ अंश गमावत त्याने ६०,७९४.३९ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकाने मात्र १८ हजारांच्या वर तग धरला. ६२.५५ अंशांच्या घसरणीसह तो दिवसाअंती १८,०८२.८५ पातळीवर स्थिरावला.
सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांमध्ये भारती एअरटेलच्या समभागात ३.०५ टक्क्यांची घसरण झाली. त्यापाठोपाठ मारुती, हिंदूस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजी, इंडसइंड बँक आणि टायटनचे समभाग पिछाडीवर होते. दुसरीकडे, सन फार्मा, आयटीसी, टेक मिहद्र, डॉ. रेड्डीज आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग मात्र वधारले होते. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मंगळवारी २,६०९.९४ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.
अमेरिकी फेडरल रिझव्र्हच्या पतधोरण समितीकडून लवकरच सुधारित व्याजदर निश्चित केले जाणार आहेत. त्या परिणामी गुंतवणूकदारांनी देशांतर्गत बाजारात नफावसुलीला प्राधान्य दिले. मात्र अमेरिकेतील रोजगारासंबंधी सकारात्मक आकडेवारीमुळे व्याज दरवाढीचा वेग कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र बाजाराने आधीपासून ७५ आधारिबदूंची व्याज दरवाढ गृहीत धरली आहे. मात्र प्रत्यक्ष घोषणेनंतर बाजाराची पुढील वाटचाल निश्चित होईल, असे मत जिओजित फायनान्शिअल सव्र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.