मुंबई : अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हने व्याजदरात ७५ आधार बिंदूंची (पाऊण टक्क्यांची) वाढ केल्याने त्याचे पडसाद जगभरातील भांडवली बाजारावर उमटले. जागतिक बाजारातील या नकारात्मक कलाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत भांडवली बाजारात गुरुवारी सलग दुसऱ्या सत्रात घसरण नोंदवली गेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिवसअखेर मुंबई शेअर बाजारचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ६९.६८ अंशांची घसरण झाली आणि तो ६०,८३६.४१ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात ४२०.९५ अंशांची घसरण नोंदवत त्याने ६०,४८५.१४ ही सत्रातील नीचांकी पातळी गाठली होती. मात्र अखेरच्या तासात गुंतवणूकदारांनी पुन्हा खरेदीला प्राधान्य दिल्याने बाजारातील घसरण कमी झाली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३०.१५ अंशांची घसरण झाली आणि तो १८,०५२.७० पातळीवर स्थिरावला.

फेडरल रिझव्‍‌र्हने आगामी काळातदेखील व्याजदर वाढ सुरू राखण्याचे संकेत दिले आहेत. अजूनही फेडच्या निर्धारित पातळीपेक्षा महागाई दर अधिक असल्याने पुढेही दरवाढ आवश्यक असल्याचे फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी स्पष्ट केले. मात्र सध्याच्या वाढीपेक्षा आगामी काळातील दरवाढीची तीव्रता व प्रमाण कमी राहणार असल्याचेही त्यांनी सूचित केले. अमेरिकेत अजूनही मंदीची चिंता सतावत असल्याने देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी निर्यातप्रधान माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा मारा केला. मात्र परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या बाजारातील खरेदीपूरक सक्रियतेने एकंदर पडझड मर्यादित राहू शकली, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांमध्ये टेक मिहद्र, पॉवर ग्रिड,  इन्फोसिस, विप्रो, एचडीएफसी, टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस आणि मिहद्र यांच्या समभागात घसरण झाली.