भांडवली, चलन, सराफा अशा सर्वच बाजारात मंगळवारी आकडय़ांमध्ये घसरण नोंदली गेली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तीन व्यवहारानंतर प्रथमच घसरताना ४३.०९ अंशांचे नुकसान सोसता झाला. मुंबई निर्देशांक दिवसअखेर २०,८५४.९२ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १६ अंशांने खाली येत ६,२०१.८५ वर थांबला.
गेल्या तीनही व्यवहारात सेन्सेक्सने तेजी राखली आहे. ती ४७७.७५ अंशांची भर होती. असे करताना निर्देशांक २१ हजारानजीक पोहोचला होता. महिन्याचा उच्चांक त्याने गाठला होता. आठवडय़ाच्या दुसऱ्या दिवशीच्या व्यवहारात मात्र जागतिक शेअर बाजारांच्या निर्देशांकावर प्रतिक्रिया नोंदवत सेन्सेक्स दिवसअखेर गुंतवणूकदारांच्या नफेखोरीने घसरला. ग्राहकपयोगी वस्तू, बँक कंपन्यांच्या समभागांचे मूल्य खालावले.
परकी चलन व्यवहारात रुपया मंगळवारी ५ पैशांनी घसरत डॉलरच्या तुलनेत ६२.३६ या तळाला येताना सलग दुसऱ्या दिवशी नकारात्मक स्थितीत राहिला. तर मुंबईच्या सराफा बाजारातही दरांमध्ये घसरण अनुभवली गेली. स्टॅण्डर्ड सोन्याचा १० ग्रॅमसाठीचा भाव १५ रुपयांनी कमी होत ३०,४९० रुपयांवर आला. चांदीच्या दरात मोठी, ८३५ रुपयांची घसरण झाल्याने पांढऱ्या धातूचा भाव किलोसाठी दिवसअखेर ४४,२९० रुपये राहिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा