गेल्या वर्षभरापासून जामीनासाठी रक्कम उभी उभारण्यात यशस्वी ठरणाऱ्या सहाराश्री सुब्रतो रॉय यांच्या मदतीसाठी अखेर मुळचे भारतीय व्यावसायिक रुबेन बंधू धाऊन आले आहेत.
फोर्ब्स श्रीमंतांच्या यादीत समावेश असलेल्या सध्या ब्रिटनस्थित डेव्हिड व सिमॉन रुबेन यांनी रॉय यांच्या मालकीच्या हॉटेलवर असलेले कर्ज उचण्याचे जाहीर केले आहे. यानुसार लंडनमधील ग्रॉसव्हनोर हाऊस हॉटेलला देऊ केलेले बँक ऑफ चायनाचे ५,५,०० कोटी रुपये आपल्याकडे घेण्याचे मान्य केले आहे. यामुळे या हॉटेलचा लिलाव आता रद्द होण्याची शक्यता असून कर्ज हस्तांतरण व्यवहार येत्या चार महिन्यात पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.
गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणात रॉय वर्षभरापासून नवी दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहेत. त्यांच्या जामीनासाठी १०,००० कोटी रुपये भरण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. रुबेन बंधूंमुळे सहारा समूह निम्मी रक्कम उभारू शकेल. समूहाच्या अमेरिकेत आणखी दोन हॉटेल मालमत्ता आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा