* राष्ट्रीयीकृत सिंडिकेट बँकेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार सुधीर कुमार जैन यांनी अलीकडेच स्वीकारला. जैन हे यापूर्वी बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. पात्र चार्टर्ड अकाऊंटंट असलेले जैन हे वाणिज्य शाखेतील पदवीधर आहेत. जून १९८७ मध्ये देना बँकेत पत व्यवस्थापक म्हणून त्यांनी बँकिंग क्षेत्रातील कारकीर्द सुरू केली. त्यानंतर उत्तरोत्तर पदोन्नती मिळवीत त्यांनी देना बँकेच्या कोलकाता, अहमदाबाद आणि नवी दिल्ली विभागात क्षेत्रीय व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. शिवाय त्यापुढे लेखा विभाग, राजकोष, आंतरराष्ट्रीय व्यवसाय, रिटेल बँकिंग अशा विभागांचे महाव्यवस्थापक म्हणून तसेच बँकेच्या गुंतवणूकदार संबंध विभागाचे प्रमुख म्हणूनही जैन यांनी यशस्वी कामगिरी करून दाखविली आहे.
सुधीर कुमार जैन सिंडिकेट बँकेचे नवीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
* राष्ट्रीयीकृत सिंडिकेट बँकेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार सुधीर कुमार जैन यांनी अलीकडेच स्वीकारला. जैन हे यापूर्वी बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. पात्र चार्टर्ड अकाऊंटंट असलेले जैन हे वाणिज्य शाखेतील पदवीधर आहेत. जून १९८७ मध्ये देना बँकेत पत व्यवस्थापक म्हणून त्यांनी बँकिंग क्षेत्रातील कारकीर्द सुरू केली.
First published on: 11-07-2013 at 12:07 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir jain become new president and managing director of syndicate bank