ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या गाळप हंगामात १५ डिसेंबपर्यंत देशात साखरेचे ४२.२५ लाख टन उत्पादन झाले असून, ते गेल्या वर्षांतील हंगामाच्या तुलनेत ४७ टक्क्यांनी अधिक असल्याचे आढळून येत आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षांतील १५ डिसेंबपर्यंत १२.९६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते, त्या उलट यंदा उत्पादन २०.७३ लाख टनांवर गेले आहे.
जगातील दुसरा मोठा साखर उत्पादक आणि सर्वाधिक मागणी असलेल्या देशात गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत २८.७७ लाख टन इतके साखरेचे उत्पादन झाले होते, असे भारतीय साखर कारखाना महासंघ (इस्मा)ने प्रसिद्धीपत्रकान्वये स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत ४२६ साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरू झाला होता, त्या उलट १५ डिसेंबर २०१४ पर्यंत ४४२ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे, म्हणजे कारखान्यांच्या संख्येतही यंदा वाढ झाली आहे.
महाराष्ट्रात सुमारे ६० टक्क्यांनी यंदा साखरेचे उत्पादन वाढले आहे. त्या खालोखाल उत्तर प्रदेशात ७.९४ लाख टन साखरेचे उत्पादन आजवर झाले आहे, जे गेल्या वर्षांतील याच कालावधीपर्यंतच्या ३ लाख टनांच्या तुलनेत दुपटीहून अधिक वाढले आहे.किमती मात्र नीचांकाला
उत्पादन वाढत आहे आणि त्या परिणामी साखरेच्या किमतीही दिवसागणिक ओसरत आहेत. प्रति क्विंटल १० ते ४० रुपये या दराने किमती पडत असल्याचे ‘इस्मा’ने म्हटले आहे. प्रति क्विंटल ५०० ते ७०० रुपये अशी साखरेची सध्याची किंमत ही तीन वर्षांतील सर्वात निम्न पातळीला जाणारी असून, ती उत्पादन खर्चापेक्षाही खाली गेली आहे, असा ‘इस्मा’ने दावा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा