सॉफ्टबँक समर्थित भारतीय अन्न वितरण स्टार्टअप स्विगीकडून गुरुवारी सांगण्यात आले की, ते स्पर्धात्मक देशांतर्गत बाजारपेठेत त्यांचे स्थान आणखी मजबूत करण्यासाठी त्यांच्या किराणा वितरण सेवा इन्स्टामार्ट मध्ये ७०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करेल. किराणा डिलिव्हरी सेवा इन्स्टामार्ट पहिल्यांदा बेंगळुरूमध्ये सुरू करण्यात आली होती आणि यानंतर गेल्या वर्षी गुरुग्राममध्ये किराणा डिलिव्हरी सेवा इन्स्टामार्ट उघडण्यात आले आहे. याच दरम्यान पुढील तीन तिमाहीत १ अब्जच्या सकल व्यापारी मूल्य दरापर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे. तसेच स्विगीची सेवा ही देशातील १८ शहरांमध्ये पसरलेली आहे आणि दर आठवड्याला १ दशलक्षाहून अधिक ऑर्डर वितरित करते. याशिवाय देशातील प्रमुख शहरांमध्ये १५ मिनिटांत डिलिव्हरी करण्याच्या टार्गेटवर काम करत असल्याच स्विगीने सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशव्यापी लॉकडाऊनमुळे होम डिलिव्हरी सेवा देणाऱ्या कंपन्यांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागला. पण, स्विगी किंवा अशा इतर कंपन्यांमुळे, लॉकडाऊनच्या कठीण परिस्थितीतही लोकांना होम डिलिव्हरीची सुविधा मिळत राहिली. सरकारी अंदाजानुसार २०२४ पर्यंत भारतीय ऑनलाइन किराणा बाजार १८.२ बिलियनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. तर २०१९ मध्ये भारतीय ऑनलाइन किराणा मालाची बाजारपेठ १.९ अब्ज इतकी होती.

स्विगीचा इन्स्टामार्ट उपक्रम टाटाच्या मालकीच्या ऑनलाइन वितरण कंपनी बिगबास्केटशी स्पर्धा करत आहे. याशिवाय ग्रोफर्सच्या कडव्या आव्हानाचाही सामना करू शकतो. ग्रोफर्स स्विगीचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी झोमॅटो द्वारे चालवला जातो. याशिवाय स्विगीच्या इन्स्टामार्ट उपक्रमाला अॅमेझॉन-रन अमेझॉन फ्रेश आणि रिलायन्स-रन जिओमार्ट यांच्याकडून कठीण आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

स्विगीचे सीईओ हर्ष मेहता यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, कंपनीचा एकूण अन्न वितरण व्यवसाय ३ अब्जच्या व्यापारी मूल्यावर कार्यरत आहे. ब्लूमबर्गच्या एका बातमीनुसार, स्विगी इन्वेस्कोच्या नेतृत्वाखाली ७०० दशलक्ष डॉलर्सची निधी उभारण्याच्या तयारीत आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swiggy to invest 700 million in grocery delivery vertical instamart scsm