‘नॅनो’ घरनिर्मितीतील शिरकावाद्वारे माफक दरातील पहिला गृह प्रकल्प यशस्वी करणाऱ्या टाटा समूहाने बोईसरमध्येच दुसरा प्रकल्प साकारण्याची घोषणा केली आहे. बोईसर रेल्वे स्थानकापासून सध्याच्या प्रकल्पापेक्षा अधिक जवळ असलेल्या नव्या ठिकाणी १७ लाख रुपयांपुढील घरे उपलब्ध होणार आहेत.
समूहातील टाटा हाऊसिंग डेव्हलमेन्ट कंपनीच्या टाटा व्हॅल्यू होम्स या उपकंपनीमार्फत न्यू हेवन नाममुद्रेंतर्गत ही घरे १बीएचके ते २.५बीएचके आकारातील असतील. कंपनीने २००९ मध्ये सुरुवात केलेल्या बोईसरमधील ३,००० घरांची पूर्णत: झाली असून खरेदीदारांनी तेथील घरांमध्ये वास्तव्यही सुरू केले आहे.
२.१० कोटी घरांचा तुटवडा लक्षात घेता टाटा समूहामार्फत घरनिर्मितीसाठी नव्याने उचलण्यात आलेले पाऊल ही दरी कमी करील, असा विश्वास यानिमित्ताने टाटा हाऊसिंगचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रोतिन बॅनर्जी यांनी व्यक्त केला. कंपनीने यापूर्वी संपूर्ण घरखरेदी प्रक्रिया ऑनलाइन माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे.
‘महिंद्र’ची जपानी कंपनीबरोबर भागीदारी
महिंद्र समूहातील महिंद्र लाइफस्पेसेसने सुमिटोमो कॉर्पोरेशनबरोबर भागीदारी करीत उत्तर चेन्नईमध्ये औद्योगिक उद्यान विकसित करण्याचे ठरविले आहे. ७०० एकर जागेवरील या वाणिज्य प्रकल्प उभारणीसाठी ३७५ कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्यधिकारी अनिता अर्जुनदास यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.

Story img Loader