टाटा हाऊसिंगच्या ‘आमंत्रा’ प्रकल्पाचा दुसरा टप्पा जाहीर करण्यात आला आहे. आरामदायी श्रेणीतील ही घरे कल्याण (पश्चिम) परिसरातच असतील.ठाणे – कल्याण मार्गावर (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३) कंपनीचा सध्या याच प्रकल्पांतर्गत टू तसेच थ्री बीएचके आकारातील ७०० घरे आहेत. ऑक्टोबर २०११ मध्ये याअंतर्गत सादर केलेली सर्व घरे सहा महिन्यात विकली गेली. आता याच परिसरात दुसऱ्या टप्प्यात टु तसेच त्थ्री बीएचके आकारातील ५६५ घरे ही ५,८०० रुपये चौरस फूट दराने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये १४, २४, २९ व ३४ मजली टॉवर आहेत. १४ मजल्यावर जॉगिंग ट्रॅकही आहे. कल्याण परिसरातील सर्वात मोठी इमारत उभारण्याचा मान या प्रकल्पामुळे टाटा हाऊसिंगला मिळाला आहे.
टाटा हाऊसिंगच्या ‘आमंत्रा’चा दुसरा टप्पा
टाटा हाऊसिंगच्या ‘आमंत्रा’ प्रकल्पाचा दुसरा टप्पा जाहीर करण्यात आला आहे. आरामदायी श्रेणीतील ही घरे कल्याण (पश्चिम) परिसरातच असतील.ठाणे - कल्याण मार्गावर (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३) कंपनीचा सध्या याच प्रकल्पांतर्गत टू तसेच थ्री बीएचके आकारातील ७०० घरे आहेत.
First published on: 07-03-2013 at 12:08 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata housing announces the launch of amantra phase ii