वाढ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मारुती सुझुकीने जानेवारीमध्ये एकूण १,१६,६०६ वाहनांची विक्री करून जवळपास १४ टक्के विक्रीतील वाढ नोंदविली. देशांतर्गत प्रवासी वाहन विक्रीतील वाढही ९ टक्क्य़ांहून अधिक आहे. यामुळे एक लाख विक्रीचा स्तर कंपनीला या कालावधीत राखता आला.
* यामाहा मोटर इंडियाच्या दुचाकी विक्रीत २०.८२ टक्के वाढ झाली. स्पोर्ट बाईक म्हणून विशेष ओळख असलेल्या कंपनीची यंदा ३९,३०९ वाहने विकली गेली आहेत.
* आयशर मोटर्सचा भाग असलेल्या रॉयल एनफिल्डने यंदा तब्बल ४३ टक्के विक्रीत वाढ नोंदविली. जानेवारीत कंपनीच्या २८,९२७ दुचाकींची विक्री झाली. कंपनीच्या मोटरसायकलची निर्यातही तब्बल ८२ टक्के झाली आहे.

* टीव्हीएस मोटर्सच्या विक्रीत यंदा केवळ १.२ टक्क्य़ांची वाढ नोंदली गेली. कंपनीच्या १.८८ लाख वाहनांची विक्री जानेवारीमध्ये झाली. कंपनीच्या स्कूटर विक्रीने मात्र २४ टक्क्य़ांची भर घातली आहे.

घट
* जनरल मोटर्सची विक्री गेल्या महिन्यात १६.०१ टक्क्य़ांनी रोडावत ४,६६७ वर येऊन ठेपली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपनीची पाच हजारांहून अधिक वाहने विकली गेली होती.
* बजाज ऑटोच्या मोटरसायकल विक्रीत यंदा १२ टक्क्य़ांची घट झाली आहे. कंपनीने जानेवारीत २,४६,९५५ दुचाकी विकल्या. कंपनीची निर्यात किरकोळ, ४ टक्क्य़ांनी वाढून १,४२,९९२ झाली आहे. कंपनीची वाणिज्य वाहने मात्र १४ टक्क्य़ांनी वाढली आहेत.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata motors sale increase in compare to hyundai