देशातील खासगी क्षेत्रातील आघाडीची वीजकंपनी असलेल्या ‘टाटा पॉवर कंपनी’ने २०१२-१३ या वर्षांत ३४,६८२ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती केली असून ती मागच्या वर्षीच्या तुलनेत ९० टक्के जादा आहे.
‘टाटा पॉवर कंपनी’ औष्णिक, जलविद्युत आणि वायूवर आधारित वीजप्रकल्पांबरोबरच अपारंपरिक स्रोतांमधून वीजनिर्मिती करत आहे. त्यामुळे कंपनीची स्थापित वीजनिर्मिती क्षमता आता ८५२१ मेगावॉटवर पोहोचली आहे. मागच्यावर्षी २०११-१२ मध्ये कंपनीने १८,३१७ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती केली होती. तथापि मुंद्रा (गुजरात) येथील चार हजार मेगावॉटचा विशाल वीजनिर्मिती प्रकल्प सुरू झाला व कंपनीची क्षमता लक्षणीय प्रमाणात वाढली.        त्यातून आधीच्या वर्षीपेक्षा तब्बल ९० टक्के जादा म्हणजे जवळपास दुप्पट वीज ‘टाटा पॉवर’ने तयार केली.

Story img Loader