व्यवसाय पुनर्रचनेचा एक भाग म्हणून टाटा स्टीलने ब्रिटनमधील प्रकल्पांमध्ये ९०० कर्मचाऱ्यांची कपात जाहीर केली आहे. सध्याच्या मंदावलेल्या युरोपीय बाजारपेठेच्या परिणामी खडतर बनलेल्या अर्थस्थितीत तोटा आटोक्यात ठेवण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. या प्रस्तावित कर्मचारी कपातीमध्ये साऊथ वेल्समध्ये ५८०, यॉर्कशायरमध्ये १५५, वेस्ट मिडलॅन्डमध्ये १२० तर टीसाईडमधील कंपनीच्या प्रकल्पात ३० जणांना नारळ मिळणार आहे. टाटा स्टीलच्या युरोपीय व्यवसाय विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्ल कोहलर यांनी सांगितले की, नोकरकपात ही दुर्दैवी आहे. रोजगार बुडालेले कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर होणारा मानसिक आघात आपण समजू शकतो. मात्र यशस्वी आणि शाश्वत व्यवसायासाठी फेरमांडणी आवश्यक ठरते आणि नोकरकपात हा त्याचाच एक भाग आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा