रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यातील वाद टाटा ट्रस्टआणि तिचे विश्वस्त यावरून सुरू झाला. १०० हून अधिक कंपन्यांचे नेतृत्व करणाऱ्या टाटा सन्सची ही सुमारे दीड शतके जुनी विश्वस्त संस्था. टाटा सन्समध्ये तिचा जवळपास पाऊण हिस्सा. समूहाच्या संस्थापकांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तिचे कार्य चालते, असा टाटा सन्सचा दावा. तर विश्वस्तांचा समूहात वाढता हस्तक्षेप असा मिस्त्री यांचा आरोप. या पाश्र्वभूमीवर देशातील अब्जावधी समूहाचे सारथ्य करणाऱ्या टाटा ट्रस्टच्या कार्यपद्धतीवर व्यवस्थापकीय विश्वस्त आर. व्यंकटरमनन हे या विशेष साप्ताहिक सदरामार्फत प्रकाश टाकतात

* टाटा ट्रस्टस्थापन करण्यामागे काय उद्धेश होता? ‘ट्रस्टचे देशातील कार्य कसे चालते?

life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
Excessive expenditure on ST Bank employees But members of bank still did not get dividend
एसटी बँकेच्या कर्मचाऱ्यांवर लाखोंची खैरात, सभासदांना ठेंगा; कर्मचारी संघटना म्हणते…
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा
Abhishek Lodha transferred 18 percent stake in the company to a charitable trust print eco news
आता लोढादेखील टाटांच्या दानकर्माच्या वाटेवर; धर्मादाय न्यासाला कंपनीतील १८ टक्के हिस्सा हस्तांतरित
person in jail to contest polls candidates win polls from prison prison contest polls
एक काळ असा होता…

‘टाटा ट्रस्ट’ ही भारताची सर्वात जुनी बिगर सरकारी समाजसेवी संस्था असून समाज विकासाच्या विविध क्षेत्रात तिचे कार्य चालते. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांच्या स्वयंप्रेरित परोपकारी विचारांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था कार्यरत असून देशासाठी समकालीन समर्पकता ठेवत समाजाच्या विकासाला गती देण्याची ताकत त्यांच्या या विचारांमध्ये आहे. थेट अंमलबजावणी आणि सह-भागीदार धोरणाद्वारे, ‘टाटा ट्रस्ट’ने शिक्षण, आरोग्य व पोषण, ग्रामीण जनजीवन, नागरी समाज व प्रशासन वाढ करणे , माध्यमे, कला, हस्तकला आणि संस्कृती तसेच नैसर्गिक स्त्रोत यांचे व्यवस्थापन यामधील नवनिर्मितीला सहकार्य केले आहे. एक आत्मनिर्भर पारिस्थिती निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘टाटा ट्रस्ट’ने वैयाक्तिक तसेच सरकारी संस्था, आंतरराष्ट्रीय संस्था आणि खासगी क्षेत्रातील समविचारी संघटनांसोबत ‘टाटा ट्रस्ट’ कार्यरत आहे.

दूरगामी  परिणाम साधण्यासाठी, अनुकरणीय आणि व्यापक उपाययोजना राबविण्यासाठी विकास, नवनिर्मिती, यंत्रणांचे मजबुतीकरण, अनुदानित आणि डेटाआधारित प्रशासनाच्या मोठय़ा प्रमाणातील एकीकृत आराखडय़ावर आम्ही गुंतवणूक करतो.

याशिवाय ‘टाटा ट्रस्ट’ हा ‘टाटा सन्स’ या देशातील सर्वात मोठय़ा समूहाचा सर्वात मोठा भागधारक (६६%) आहेच.

* समाजोपयोगी कार्यासाठी टाटा ट्रस्टकडून ठरावीक क्षेत्र अथवा प्रकल्प यांची निवड कशी केली जाते?

धर्मादायाच्या सामान्य संकल्पनेपासून दूर जाऊन, संबंधित परिसरामध्ये उपजिविकेची साधने निर्माण करणाऱ्या आणि अर्थव्यवस्थेच्या सुधारणेसाठी पूरक प्रकल्पांसोबत काम करण्याचा ‘ट्रस्ट’चा दृष्टिकोन आहे. वास्तविकपणे, टाटा समूहाचे मार्गदर्शक जे.आर.डी. टाटा यांच्या कालावधीपासूनच ते बंधनकारक करण्यात आले आहे. सबंधित क्षेत्रातील मांडलेल्या समस्या आणि लाभार्थीच्या गरजा याआधारे विविध क्षेत्र तसेच उल्लेखनीय अशा प्रकल्पांची निवड केली जाते.

* विभिन्न समुदायात अपेक्षित परिणाम मिळवणारे टाटा ट्रस्टचे सर्वात महत्वाचे असे कार्य कोणते नमूद करता येईल?

‘तंत्रज्ञान हे चांगल्या कामासाठी शक्ती म्हणून काम करू शकते’, या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘टाटा सन्स’चे हंगामी अध्यक्ष रतन टाटा यांच्या दृष्टीकोनानुसार,  महत्त्वाच्या विकास आव्हानांवर मात करण्याकरिता, तंत्रज्ञान प्रवाही करण्यासाठी आणि खुले माहितीपूर्ण व्यासपीठ वापरण्यासाठी विश्वस्त संस्था कार्यरत आहे.

विविध अनेक महत्वाच्या उपक्रमात ‘टाटा ट्रस्ट’ने अपेक्षित यश मिळवले असून, खासकरून तंत्रज्ञान गाभा असणाऱ्या काही प्रकल्पांनी स्थानिक स्तरावर मोठे परिणाम घडवून आणले आहेत. अलीकडील काळातील सर्वात यशस्वी उपक्रम म्हणजे, संसद आदर्श ग्राम योजनेच्या  प्रेरणेतून राबविण्यात आलेला Data Driven Governance क्षेत्रातील उपक्रम. या प्रकल्पाची सुरुवात विजयवाडा येथे झाली असून स्थानिक खासदार केसिनेनी श्रीनिवास यांच्या मतदारसंघातील २६४ गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. संसद आदर्श ग्राम योजनेच्या पहिल्या टप्प्यात या गावातील १० लाख व्यक्तींचे वैयक्तिक सर्वेक्षण केले आणि त्यांच्या आरोग्य आणि विकासाच्या गरजांबाबत माहिती संकलित केली. मतदारसंघातील एका गावापासून सुरुवात करून विजयवाडा जिल्ह्यतील ८००  गावांमध्ये शौचालये बांधली. ‘ट्रस्ट’ राज्य आणि केंद्र सरकारपेक्षा जास्त अनुदान शौचालयासाठी दिले. ‘ट्रस्ट’ने स्वत:चा निधी देऊन ही योजना यशस्वी केली आहे.

सुमारे १० कोटींहून अधिकांना माहिती तंत्रज्ञान मंचावर येण्यास मदत करणारा Internet Saathic हा उपक्रम राबविण्यासाठी ‘टाटा ट्रस्ट’ गूगलसह भागीदारी करीत असून मोठी गुंतवणूक केली जात आहे. जनतेचे सबलीकरण व पारदर्शकता जोमाने राबवली जाईल, अशा उपक्रमांवर ‘टाटा ट्रस्ट’ सध्या भर देत आहे.

विश्वस्त  संस्थेचे अध्यक्ष रतन टाटा यांच्यासाठी पोषक आहार हे एक महत्वाचे क्षेत्र आहे. ‘टाटा ट्रस्ट’करितादेखील  ते एक धोरणात्मक क्षेत्र आहे. आवश्यक सूक्ष्म पोषक घटकांद्वारे अन्नपदार्थ वितरणाची भक्कम व्यवस्था (Fortification of staple foods) हा पोषण आहार अंतर्गत एक महत्वाचा उपक्रम आहे. ‘आयोडीन’ व्यतिरिक्त मिठामध्ये आयर्न (लोह घटक) मिसळण्याचे काही प्रगत कार्य ‘यूनिवर्सिटी ऑफ टोरोंटो’ यांच्या मदतीने आम्ही नुकतेच पूर्ण केले आहे. तसेच मिठाच्या खरेदीसाठी पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी अनेक राज्य शासनांना मदत केली जात आहे. गेल्या शुक्रवारी उत्तर प्रदेश सरकारने ‘डबल फोर्टीफाइड सॉल्ट’ (मीठ) बाजारात आणले. त्यासाठी ‘टाटा ट्रस्ट’ने तयार केलेली उलट लिलाव प्रक्रियेचे सहकार्य मिळाले आहे. तर महाराष्ट्रात लोह मिसळलेले (फोर्टिफाय) तांदूळ आणि गहू रेशन दुकानावर विकण्याच्या पथदर्शी प्रकल्पावर विश्वस्त संस्था कार्य करीत आहे.

* विविध समाजसेवी कार्यावर टाटा ट्रस्टदरवर्षी किती रक्कम खर्च करते? रक्कम खर्च होणाऱ्या प्रकल्पांना अंतिम रूप कोण देते?

समाजसेवी कार्यावर ‘टाटा ट्रस्ट’ वर्षांला सुमारे ७५० कोटी रुपये खर्च करते. ‘टाटा सन्स’मधील ६६% मालकी हिच ‘टाटा ट्रस्ट’ची प्रमुख मालमत्ता आहे. ‘टाटा सन्स’कडून ‘टाटा ट्रस्ट’ला मिळणारा लाभांश हेच ‘टाटा ट्रस्ट’चे उत्पन्न आहे. आणि अर्थातच, समूहातील विविध कंपन्यामधून मिळणारा लाभांश हेदेखील ‘टाटा सन्सचे’ही प्रमुख उत्पन्न आहे.

या विश्वस्त संस्थेचे नियंत्रण धर्मादाय आयुक्तांकडून केले जात असून ५,००० रुपयांवरील प्रत्येक व्यवहार त्यांना कळविला जातो. अनेक निकषांच्या आधारे विश्वस्त मंडळ प्रत्येक प्रस्ताव तपासून पाहते. ‘ट्रस्ट’च्या अध्यक्षांनी मांडलेली एखादी कल्पनासुद्धा विश्व्स्त मंडळाकडून मंजूर होणे अनिवार्य आहे. अनेकदा आमच्या कल्पनासुद्धा नाकारल्या जातात.

* टाटा ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य कोण आहेत?

‘टाटा ट्रस्ट’कडे अनेक अनुभवसमृद्ध व्यक्ती आहेत. विश्वस्त संस्थेतील एकूण सदस्यांपैकी काही टाटा समूहासोबत प्रदीर्घ काळापासून कार्यरत आहेत. तर उर्वरित व्यक्ती या टाटा समूहाबाहेरील असून स्वत:च्या क्षमतेवर यशस्वी झालेले प्रतिष्ठित व्यावसायिक आहेत.