करापासून वाचण्याच्या अनेक पळवाटा करदाते वापरत असले तरी अशा बनवेगिरीच्या बंदोबस्ताचे चोख उपायही प्राप्तिकर विभागाने अवगत केल्याचे दिसून येत आहे. खरे करपात्र उत्पन्न लपविण्यासाठी वेगवेगळे खर्च केल्याची मुंबईतून करदात्यांकडून ६५०० कोटींची बनावट बिले सादर करण्यात आल्याचे प्राप्तिकर विभागाला आढळून आले असून, पुण्यातील असा बनाव ७२२ कोटी रुपयांच्या घरात जाणारा आहे. मुंबई व पुण्यात अनुक्रमे १५० व ३९ प्रकरणात करदात्यांकडून बनाव घडला आहे. महाराष्ट्राच्या विक्रीकर/ व्हॅट विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, राज्यभरातून करदात्यांकडून सादर झालेली खर्चाची बिले ही बनावट असल्याचे २००० प्रकरणातून आढळून आले आहे, असा खुलासा प्राप्तिकर विभागानेच केला आहे. प्रत्यक्षात खरेदी व्यवहार न होता हवाला विक्रेत्यांकडून मिळविलेली ही बनावट बिले असल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत असून, अशी बनवेगिरी करणाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाची करडी नजर असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई-पुण्यातून कर-चुकव्यांकडून ७००० कोटींची बनावट बिले
करापासून वाचण्याच्या अनेक पळवाटा करदाते वापरत असले तरी अशा बनवेगिरीच्या बंदोबस्ताचे चोख उपायही प्राप्तिकर विभागाने अवगत केल्याचे दिसून येत आहे. खरे करपात्र उत्पन्न लपविण्यासाठी वेगवेगळे खर्च केल्याची मुंबईतून करदात्यांकडून ६५०० कोटींची बनावट बिले सादर करण्यात आल्याचे प्राप्तिकर विभागाला आढळून आले असून, पुण्यातील असा बनाव ७२२ कोटी रुपयांच्या घरात जाणारा आहे.
First published on: 09-03-2013 at 12:08 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tax saver submit fake bill of rs 7000 crore to save tax