करापासून वाचण्याच्या अनेक पळवाटा करदाते वापरत असले तरी अशा बनवेगिरीच्या बंदोबस्ताचे चोख उपायही प्राप्तिकर विभागाने अवगत केल्याचे दिसून येत आहे. खरे करपात्र उत्पन्न लपविण्यासाठी वेगवेगळे खर्च केल्याची मुंबईतून करदात्यांकडून ६५०० कोटींची बनावट बिले सादर करण्यात आल्याचे प्राप्तिकर विभागाला आढळून आले असून, पुण्यातील असा बनाव ७२२ कोटी रुपयांच्या घरात जाणारा आहे. मुंबई व पुण्यात अनुक्रमे १५० व ३९ प्रकरणात करदात्यांकडून बनाव घडला आहे. महाराष्ट्राच्या विक्रीकर/ व्हॅट विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, राज्यभरातून करदात्यांकडून सादर झालेली खर्चाची बिले ही बनावट असल्याचे २००० प्रकरणातून आढळून आले आहे, असा खुलासा प्राप्तिकर विभागानेच केला आहे. प्रत्यक्षात खरेदी व्यवहार न होता हवाला विक्रेत्यांकडून मिळविलेली ही बनावट बिले असल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत असून, अशी बनवेगिरी करणाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाची करडी नजर असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा