नवउद्यमींना अर्थपाठबळ देणारे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा, मॅरिकोचे हर्ष मारिवाला, युनिलेझर व्हेन्चर्सचे रॉनी स्क्रूवाला, ओयो रूम्सचे रितेश अगरवाल, फ्रीचार्जचे संस्थापक कुणाल शाह आणि स्नॅपडीलचे संस्थापक कुणाल बहल आदी देशाच्या उद्योगक्षेत्रातील नवोन्मेषाचे प्रणेती मंडळी येत्या ६-७ जानेवारी ‘टायकॉन मुंबई २०१६’ परिषदेच्या निमित्ताने एका व्यासपीठावर एकत्र येत आहेत. द इंडस एंटरप्राइज (टाय)च्या मुंबई विभागाकडून ही परिषद म्हणजे देशात जोरदार वाहत असलेल्या नवउद्यमी (स्टार्टअप्स) प्रवाहाला नवे वळण देणारी ठरेल.
नरिमन पॉइंट, एनसीपीए सभागृहात होत असलेल्या या परिषदेसाठी जगभरातून १५०० हून अधिक कंपन्यांचे मुख्याधिकारी, साहसी गुंतवणूकदार, नावीन्यपूर्ण उद्यम संकल्पना असणारी मंडळी तसेच धोरणकर्त्यांकडून हजेरी लावली जाणे अपेक्षित आहे. नासकॉम, अनिता बोर्ग इन्स्टिटय़ूट, ६३ मून्स, व्हीसी सर्कल, इन्क ४२ आणि एसएमई जॉइन-अप अशा या क्षेत्रातील नामांकित संस्थांचे परिषदेच्या आयोजनात भागीदारी आहे. नवउद्यमी उपक्रमांचे सुयोग्य मूल्यांकन, महिलांमधील उद्यमशीलता अशा खास विषयांवर या निमित्ताने कार्यशाळांचेही आयोजन केले गेले आहे.

Story img Loader