तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरीच्या संधी मिळविण्यासाठी भारतातील सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रातील अग्रेसर कंपनी टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ऑस्ट्रेलियात ‘टीसीएस ग्रॅज्युएट प्रोग्राम’ नव्या रूपात सुरू केला आहे. या अंतर्गत २०१५ सालात सेवेत सामावून घ्यावयाचे उमेदवार तेथील आघाडीच्या विद्यापीठातून निवडले जातील आणि त्यांना भारत व ऑस्ट्रेलियात होणाऱ्या तीन महिन्यांच्या समग्र प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाईल.

अमेरिकी विद्यापीठाचा संपर्क क्षेत्रात पदवीपूर्व कार्यक्रम
मुंबई: अमेरिकेतील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या मिसूरी स्टेट युनिव्हर्सिटीने भारतातील विद्यार्थ्यांसाठी संपर्क (कम्युनिकेशन्स) क्षेत्रात चार वर्षांच्या विशेष पदवीपूर्व अभ्यासक्रमाची रचना केली आहे. आंतरव्यक्ती तसेच आंतरसांस्कृतिक संपर्क आणि विविधता, त्याचप्रमाणे विविध सेवा क्षेत्रात संपर्काचे महत्त्व व कसबाच्या विकसनाचा हा कार्यक्रम १०+२ उत्तीर्ण व अन्य प्रवेश पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या विद्यापीठात विविध ८५ देशांमधील १,५०० हून अधिक विद्यार्थी असून, तो विविध भाषा व संस्कृतींशी जवळीकीची ही भारतीय विद्यार्थ्यांना मिळणारी अमोल संधी असेल, असा विद्यापीठाचा दावा आहे.

Story img Loader