मोतीलाल ओसवालच्या वार्षिक संपत्ती निर्मिती अहवालाचा निष्कर्ष
* अजंठा बनली सर्वात वेगाने संपत्ती मिळवणारी नाममुद्रा
* टायटन इंडस्ट्रीजकडून सातत्यपूर्ण संपत्तीची निर्मिती
* सर्वाधिक संपत्ती गमावणाऱ्या आघाडीच्या १० कंपन्यांमध्ये जागतिक कमोडिटी बाजारात कार्यरत कंपन्यांचा समावेश.
देशातील पहिल्या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस (टीसीएस) गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक संपत्ती मिळवली आहे. याच वेळी एमएमटीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या दोन आघाडीच्या प्रमुख कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांनी सर्वाधिक पसे गमावले आहेत.
आघाडीच्या कंपन्यांच्या भांडवली बाजारातील व्यवहाराच्या मोजमापाद्वारे मोतीलाल ओसवालने केलेल्या विसाव्या वार्षकि संपत्ती निर्मिती अभ्यासातून ही बाब स्पष्ट झाली आहे. गेल्या पाच वर्षांतील अभ्यासावर आधारित याबाबतच्या अहवालानुसार, टाटा समूहातील टीसीएसने २०१० ते २०१५ या कालावधीत ३,४५८ अब्ज रुपयांची संपत्ती कमावली. पाठोपाठ आयटीसीने १,५६५ अब्ज रुपये, तर एचडीएफसी बँकेने १,५४० अब्ज रुपये संपत्ती कमावली आहे.
संपत्ती निर्मितीच्या या प्रक्रियेत संबंधित कंपनीच्या बाजारातील एकूण भागभांडवलात त्यांच्या शेअर बाजारातील भागधारकांकडून भर पडत असते.
टीसीएसने २०१० ते २०१५ या कालावधीत सर्वाधिक संपत्ती कमावली आहे. २००९-२०१४ आणि २००८-२०१३ नंतर सलग तिसऱ्या अभ्यास अहवालात टीसीएसने आपले अग्रस्थान कायम राखले आहे.
भांडवली बाजारातील आघाडीच्या १० कंपन्यांमध्ये सन फार्मा (चौथा क्रमांक), िहदुस्थान युनिलिव्हर (पाचवा क्रमांक), एचसीएल टेक (सहावा क्रमांक), एचडीएफसी (सातवा क्रमांक), टाटा मोटर्स (आठवा क्रमांक), इन्फोसिस (नववा क्रमांक) व अॅक्सिस बँक (दहावा क्रमांक) यांचा समावेश आहे.
औषध निर्मिती करणाऱ्या अजंठा फार्मा कंपनीने २०१० ते २०१५ या कालावधीत सर्वाधिक वेगाने संपत्ती कमावली आहे. टायटन कंपनीने आपल्या भागधारकांसाठी सर्वाधिक सातत्याने संपत्ती कमावली आहे. अभ्यासाच्या अहवालानुसार २०१०-२०१५ या कालावधीत संपत्ती गमावणाऱ्या आघाडीच्या १० कंपन्यांमध्ये एमएमटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, सेल, एनएमडीसी, भेल, जिंदाल स्टील, एनटीपीसी, िहदुस्तान कॉपर, वेदांता आणि टाटा स्टील या कंपन्यांचा समावेश आहे. एकत्रितरीत्या वरील सर्व कंपन्यांनी गेल्या पाच वर्षांत ६,४९४ अब्ज रुपये संपत्ती गमावली आहे.
२०१०-२०१५ या कालावधीत एकूण १४.६ लाख कोटी रुपये संपत्ती गमावली. ही रक्कम आघाडीच्या १०० कंपन्यांनी कमावलेल्या एकूण रकमेच्या ४३ टक्के इतकी आहे.
सर्वाधिक संपत्ती गमावणाऱ्या आघाडीच्या १० कंपन्यांमध्ये जागतिक कमोडिटी बाजारात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. याला फक्त भेल, एनटीपीसी यांचा अपवाद आहे. या दोन्ही सार्वजनिक क्षेत्रातील आहेत. संबंधित १० कंपन्यांपकी सहा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आहेत. कंपन्या कार्यरत असणाऱ्या विभागानुसार गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक संपत्ती कमावणाऱ्या कंपन्यांमध्ये किरकोळ तसेच ग्राहक सेवासंबंधी कंपन्यांचा समावेश आहे. त्यानंतर अर्थविषयक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे.
संपत्ती कमावणाऱ्या १०० कंपन्यांचा क्रम ठरवण्यात आला आहे. यानुसार गेल्या पाच वर्षांत कंपनीच्या सुरुवातीच्या भागभांडवलाचा आणि सद्य सांपत्तिक स्थितीमधील फरकाचा अभ्यास करण्यात आला आहे.
सलग तिसऱ्या वर्षी ‘टीसीएस’ला सर्वाधिक संपत्ती-निर्मात्या कंपनीचा बहुमान
मोतीलाल ओसवालच्या वार्षिक संपत्ती निर्मिती अहवालाचा निष्कर्ष
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 25-12-2015 at 00:06 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tcs is the most wealth producer company