Be Fearful When Others Are Greedy and Greedy When Others Are Fearful
– Warren Buffett
तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळी मराठीत सुविचार म्हणून शाळेतल्या फळ्यावर आढळतात. गुंतवणूक शास्त्रात बेन्जामिन ग्रॅहॅम, हेन्री मर्कोविट्झ, वॉरेन बफे यांनी उच्चारलेल्या वाक्यांना सुविचाराचे मोल येते. आजच्या परिस्थितीत कुणाला गुंतवणूक करण्याचा सल्ला देणे म्हणजे वादाला आमंत्रण देण्यासारखे आहे. म्हणून आजच्या भागाची सुरुवात या सुविचाराने केली.
श्रावणाच्या आगमनाआधीच ‘अर्थवृत्तान्त’च्या वाचकांना ‘शिवामुठी’चे वेध लागले होते. वार्षकि नीचांकांच्या यादीत रोज नवीन भर पडत असतानाच चार भागांच्या मालिकेचा घाट घातला आहे. नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ कोणी शोधू नये असा समज आहे. याच चालीवर बाजाराचा तळ शोधण्याचा प्रयत्न केल्यास फक्त वैफल्यच वाटय़ाला येते. म्हणून श्रावणाच्या आगमनाचा मुहूर्त धरून निवडक ‘मिड-कॅप’ समभागांची शिफारस करीत आहे.
ल्ल भारतासहित चार देशांत ३८,७५८ एकर क्षेत्रावर पसरलेले ६३ चहाचे मळे व ६२ चहा प्रक्रिया कारखाने ८७,००० कर्मचारी असलेली ही भारतातील सर्वात मोठी चहा कंपनी आहे. जगाच्या एकूण चहा उत्पादनाच्या २%, तर भारताच्या चहा उत्पादनाच्या ८% उत्पादन मॅक्लॉइड रसेलच्या चहाच्या मळ्यात होते.
गेल्या आíथक वर्षांत एकूण चहा उत्पादन १०२ दशलक्ष टन होते. त्यातील ९०% चहाचा वाटा ‘आयटीसी’, तर उर्वरित वाटा ‘आसाम टी’ या प्रकारच्या चहाचा होता. कंपनीचे भारतात ५३ चहाचे मळे (४८ आसाम व ५ पश्चिम बंगालमध्ये) आहेत. शिवाय तीन व्हिएतनाममध्ये, सहा युगांडात, तर एक रवांडात असे विदेशात आहेत. जगाच्या एकूण चहा उत्पादनापकी सर्वात जास्त (१,१११ दशलक्ष टन) चहा उत्पादन भारतात होते. भारतानंतर श्रीलंका, केनिया, चीन व इंडोनेशिया या देशांचा याबाबत क्रमांक लागतो. गेल्या वर्षी कंपनीने सात कारखान्यांतील हाती घेतलेला विस्तार कार्यक्रम पूर्ण केला आहे.
मॅक्लॉइड रसेलने पहिल्या तिमाहीचे उत्तम निकाल जाहीर केले आहेत. व्याज घसारा व करपूर्व नफा गेल्या वर्षांतील पहिल्या तिमाहीपेक्षा यंदा अनुक्रमे २१%, तर ३२% वाढला आहे. गेल्या वर्षांपेक्षा चहाच्या घाऊक किमती कमी झाल्यामुळे जानेवारी २०१३ पासून शेअरच्या किमतीतही २०% घट आली (शेअरचा भाव २०% खाली आला) आहे. या उद्योगात बहुतांश खर्च स्थिर असतो. त्यामुळे थोडे जरी उत्पादन वाढले तरी चहाच्या मा(म)ळ्याचा प्रति किलो खर्च कमी होतो. अपुऱ्या पावसामुळे गेल्या वर्षी कंपनीच्या भारतातील चहा मळ्यातून उत्पादन कमी झाले होते. मागील अख्ख्या वर्षांचा खर्च १४१ रुपये प्रति किलो होता. या वर्षी पुरेशा पावसामुळे चहा उत्पादन ८% वाढेल आणि खर्च १३३ रुपये/किलो असेल. त्यामुळे व्याज घसारा व करपूर्व नफा प्रति किलो ४४ रुपये असेल; परंतु निसर्गाची अवकृपा झाली, तर बदललेल्या वातावरणामुळे हातचे पीक गेल्याचे अनेक प्रसंग घडल्याची उदाहरणे आहेत. तरीदेखील नवीन खरेदी करण्यासाठी एक आकर्षक संधी म्हणून या शेअरकडे पाहायला हरकत नाही. गेल्या वर्षी रु. ३१९ या दराला खरेदीची शिफारस करून रु. ३६८ चे लक्ष्य दिले होते. २२ फेब्रुवारी रोजी ३८६.९५ हा सर्वोच्च भाव नोंदला गेला. येत्या वर्षभरात १५-२०% परतावा या गुंतवणुकीतून शक्य आहे.
ल्ल ‘ला उपाला’ ही काचेच्या भांडय़ाची एक प्रतिष्ठित नाममुद्रा असून राजेशाही जीवनशैलीशी साधम्र्य सांगणारी आहे. या कंपनीची स्थापना १९८७ मध्ये त्या वेळच्या कलकत्ता (आता कोलकाता) शहरात झाली. १९९५ मध्ये कंपनीची नोंदणी शेअर बाजारात झाली. पहिल्या खुल्या विक्रीत प्रवर्तकांनी आपले ८.५० लाख शेअरचे हस्तांतरण केले. मुंबई शेअर बाजारात या कंपनीचे व्यवहार ५२६९४७ या संकेतांकाखाली, तर राष्ट्रीय शेअर बाजारात छडफॅछ या आद्याक्षराखाली होतात. सुशील झुनझुनवाला व अजित झुनझुनवाला हे बंधू या कंपनीचे प्रवर्तक असून सुशील झुनझुनवाला व्यवस्थापकीय संचालक आहेत. झारखंड राज्यात मधुपूर व उत्तराखंड राज्यात सितारगंज येथे कंपनीचे प्रकल्प आहेत. कंपनीने दक्षिण कोरियातील ‘डॉसन ग्लास’बरोबर तांत्रिक सहकार्य केले आहे. ला उपाला पारदर्शी (उ१८२३ं’६ं१ी) व अपारदर्शी (डस्र्ं’६ं१ी) भांडय़ांचे उत्पादन करते. अपारदर्शी उत्पादनांत कपबशा, लहान व मोठय़ा जेवणासाठी वापरावयाच्या प्लेट, सूपबाऊल, सूपस्पून, टेबलावर भात व अन्य खाद्यपदार्थ ठेवण्याच्या काचेच्या भांडय़ांचा समावेश होतो. पारदर्शी उत्पादनात मद्याची लज्जत वाढविणारे कटग्लासेस, भोजनानंतर आईस्क्रीम किंवा अन्य गोड पदार्थ खाण्यासाठी वापरावयाच्या काचेची बाऊल, मायक्रोवेव्हमध्ये उच्च तापमानात टिकणारी अन्नपदार्थ शिजविण्याची भांडी आदींचा समावेश होतो. अपारदर्शी भांडय़ांच्या बाजारपेठेत कंपनीच्या उत्पादनांचा ४०% वाटा आहे. सुमारे १०० वितरक व १,००० विक्री केंद्रांच्या माध्यमातून कंपनी आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवत असते. याव्यतिरिक्त रिलायन्स लाइफस्टाइल, हायपरसिटी, पॅन्टलुन, बिग बाजार आदी साखळी दुकानांतून कंपनीच्या मालाची विक्री होत असते. पारदर्शी उत्पादने ‘क्रिस्टल’ व ‘दिवा’ या नाममुद्रांनी विकली जातात. या नाममुद्रा राजेशाही जीवनशैलीशी निगडित आहेत. लक्ष्मीपुत्रांबरोबर अभिरुचीसंपन्न उच्च मध्यमवर्गातदेखील विशेषप्रसंगी वापरावयाच्या गोष्टींत या कंपनीच्या उत्पादनांचा समावेश होतो.
कंपनीने २५ कोटी रुपये खर्चून सितारगंज कारखान्याची विस्तारयोजना नुकतीच पूर्ण केली आहे. त्यामुळे अपारदर्शी भांडय़ांची वार्षकि क्षमता १२,५८० टनांवर गेली आहे. या विस्ताराची फळे चालू आíथक वर्षांत दिसून येतील. एकत्र कुटुंब पद्धतीकडून विभक्त कुटुंब पद्धतीकडे भारताची सामाजिक वाटचाल सुरू आहे. पूर्वी घरात वापरावयाच्या एका वस्तूच्या जागी आता अनेक वस्तू लागत आहेत. तसेच आजकालच्या साध्या जीवनशैलीकडून विलासी जीवनशैली जगण्याकडे तरुणाईचा कल असल्याच्या सामाजिक बदलाची ला उपाला लाभार्थी ठरत आहे. काचेच्या भांडय़ाची बाजारपेठ फार मोठी नाही. या बाजारपेठेत ला उपाला स्वत:चे अस्तित्व राखून असलेली कंपनी आहे. गेल्या तीन वर्षांत विक्री २८%, तर नफा ३२% वाढला आहे. २०१३ मध्ये विक्री ३४% वाढून १५३.९ कोटी, तर निव्वळ नफा ८२% वाढून २२.९ कोटी झाला आहे. रुपयाच्या अवमूल्यनामुळे आयात महाग झाली आहे, तर निर्यात स्वस्त झाली आहे. त्यात भारतात असलेल्या सीमाशुल्क व अन्य कररचनेमुळे काचेच्या वस्तूंची आयात व्यवहार्य नाही. देशी उत्पादकांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने चीनमधून आयात होणाऱ्या वेगवेगळ्या काच सामानांवर डिसेंबर २०१२ पासून पाच वर्षांसाठी ४१.६% ते ११०.९% कर लावण्यात आला आहे. हा कर काढून टाकावा अथवा कमी करावा यासाठी जागतिक व्यापार संघटनेच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकण्याचे काम इतर देशांकडून होत आहे. जोपर्यत हा कर अस्तित्वात आहे तोपर्यंत ला ओपलाला आयातीत स्वस्त काच सामानापासून संरक्षण लाभले आहे.
मॅक्लॉइड रसेल (इं) लिमिटेड
सद्य बाजारभाव रु. २७५.७५
दर्शनी मूल्य रु. १०
वर्षांतील उच्चांक/नीचांक रु. ३८७/ रु. २५८
ला ओपाला आरजी
सद्य बाजारभाव रु. ३९८.५५
दर्शनी मूल्य रु. १०
वर्षांतील उच्चांक/नीचांक रु. ४४१/ रु. ११०