गोल्डन टीप्स टी कंपनी लि., वेरी टी, मकईबारी टी, सिमला टी कं. लि. वगैरे जगातील दर्जेदार चहा उत्पादक मुंबईत १ ऑक्टोबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान होत असलेल्या ‘वर्ल्ड टी अँड कॉफी एक्स्पो’निमित्त एका व्यासपीठावर येत आहेत. चहाचे उत्पादन घेणाऱ्या आठ देशांतील व्यापार प्रतिनिधी तसेच चहाप्रेमी १० देशांतील प्रेक्षक या आंतरराष्ट्रीय मेळ्यासाठी येथे एकत्र येणे अपेक्षित आहे.
नव्याने विकसित होत असलेल्या कॅफे संस्कृतीतही पारंपरिक चहा-कॉफीची लज्जत कायम राखून अनेक नावीन्यपूर्ण उत्पादने सादर झाली आहेत, त्यांचा एकाच ठिकाणी आस्वाद घेण्याची संधी यानिमित्ताने चहाप्रेमींना मिळेल. याशिवाय विक्रेते, होलसेलर्स, पुरवठादार, आयातदार-निर्यातदार, चहा-कॉफी प्रस्तुत करणारी नव्या साखळी दालने, हॉटेल्स, उपाहारगृहे यांचे प्रमुख, स्पा-रिसॉर्ट्सचे चालक यांचीही मेळ्याच्या तीन दिवसांत हजेरी लागणे अपेक्षित आहे. सेन्टिनल एक्झिबिशन्स एशिया कडून आयोजित हा आंतरराष्ट्रीय मेळा गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन संकुलात होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा