भारतीय जनमानस पारंपरिकरीत्या चहाचा चाहता राहिला असला तरी अलीकडे विशेषत: शहरी भागांत कॉफीला ग्राहकांमधून पाठबळ वाढत असल्याचे दिसून येते. या उद्योगाच्या ताज्या पाहणीनुसार, भारतात चहा उद्योगाची अलीकडची वाढ वार्षिक ३ ते ५ टक्के दराने सुरू असून, कॉफी उद्योग त्यापेक्षा दुपटीने म्हणजे ८-१० टक्के दराने प्रगती करीत आहे.

कॉफीचे भारतात ३२७० लाख किलोग्रॅम कॉफीचे उत्पादन गेल्या हंगामात झाले, तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा चहा उत्पादक असलेल्या भारतात वार्षिक १२५ कोटी किलोग्रॅम चहाचे उत्पादन होते. तुलनेने खूप कमी उत्पादन असतानाही कॉफी उद्योगाची आर्थिक उलाढाल चहाच्या तुलनेत खूप मोठी आहे. शिवाय चहापुढे विदेशात होणाऱ्या आयातीचेही मोठे आव्हान आहे. चहा-कॉफी उद्योगापुढील या महत्त्वाच्या प्रश्नांचा वेध घेणारे आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा १ ऑक्टोबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान मुंबईत गोरेगाव येथील प्रदर्शन संकुलात होत आहे.
सेंटिनल एक्झिबिशन्स एशियाद्वारे आयोजित या वर्ल्ड टी अ‍ॅण्ड कॉफी एक्स्पोची ही यंदाची तिसरी आवृत्ती असून, विविध सहा देशांमधून ५०हून अधिक महत्त्वाच्या ब्रॅण्ड्सचा या प्रदर्शन व परिषदेत सहभाग असेल.

Story img Loader