रिझव्र्ह बँकेच्या दरकपातीचे ज्या शेअर बाजाराने स्वागत केले तो बाजार आता वाणिज्य बँकांसाठी पुनर्रचित कर्जाबाबत रिझव्र्ह बँकेने वाढविलेल्या मर्यादेबद्दल चिंतातूर बनला आहे. सप्ताहअखेर सलग दुसऱ्या दिवशी शतकी घसरणीने ‘सेन्सेक्स’ तीन आठवडय़ाच्या तळाला पोहोचला, तर निफ्टीने ६ हजाराची भावनात्मक पातळी तोडली.
कंपन्यांच्या तिमाही कामगिरीच्या जोरावर तेजीचे नवे क्षितिज गाठू पाहणाऱ्या निर्देशांकाला शुक्रवारी काही आघाडीच्या कंपन्यांच्या खराब तिमाही कामगिरीचाही अनुभव घ्यावा लागला. आज वित्तीय निकाल जाहीर करणाऱ्या भेल, भारतीसह बँक समभागांचे मूल्यही आज कमी झाले. सलग १२ तिमाहीत नफ्यात घसरण नोंदविणाऱ्या भारती एअरटेलचे समभाग मूल्य २.६२ टक्क्यांनी खालावले. भेलमधील नुकसानही एक टक्क्याच्या जवळपास होते. तर ‘सेन्सेक्स’मध्ये घसरणीत टाटा मोटर्स आघाडीवर दिसून आला. हा समभाग कालच्या तुलनेत ४.३६ टक्क्यांनी घसरला. याचबरोबर आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, एचडीएफसी बँक यांचेही समभाग मूल्य दोन टक्क्यांपर्यंत खाली आले होते. ‘सेन्सेक्स’मधील ३० पैकी १८ समभाग घसरणीच्या यादीत होते. व्याजदराशी निगडित बांधकाम, वाहन, बँक क्षेत्रीय निर्देशांकातील घसरण ०.७९ ते १.१६ टक्क्यांपर्यंतची होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा