सप्टेंबरच्या पतधोरणात अनपेक्षितरित्या घसघशीत अध्र्या टक्क्य़ाची दर कपात करणारे रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर मंगळवारच्या द्विमासिक पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवण्याचीच अधिक अपेक्षा आहे. डिसेंबरअखेरचे अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हचे व्याजदर वाढीचे पाऊल तसेच फेब्रुवारीमधील मोदी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प यानंतरच दर कपातीचा निर्णय रिझव्‍‌र्ह बँक घेतले जाण्याची अर्थतज्ज्ञांची अटकळ आहे.
चालू आर्थिक वर्षांतील पाचवे द्विमासिक पतधोरण रिझव्‍‌र्ह बँक मंगळवारी जाहीर करणार आहे. मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन हे सकाळी ११ वाजता याबाबतचा आपला निर्णय घोषित करतील. गव्हर्नरांनी सप्टेंबरमध्ये एकदम अध्र्या टक्क्य़ाची दर कपात केली होती. मात्र यानंतर व्यापारी बँकांनी त्या प्रमाणात आपले गृह-वाहन आदी कर्ज स्वस्त केले नाहीत.
अन्न धान्यांच्या वाढत्या किंमतींमुळे ऑक्टोबरमधील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ५ टक्क्य़ांपर्यंत वाढला आहे. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयाचा प्रवास गेल्या काही दिवसांमध्ये दोन वर्षांच्या तळात विसावल्याची चिंताही रिझव्‍‌र्ह बँकेसमोर कायम आहे. तेव्हा आता होणारी व्याजदर कपात ही रिझव्‍‌र्ह बँकेच्या फेब्रुवारीतील पतधोरणातच होईल, अशी अपेक्षा बँकतज्ज्ञांचीही आहे. यावेळी किमान पाव टक्के दर कपात होण्यास हरकत नाही, असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Story img Loader