आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रातील आघाडीच्या थॉमस कूकने ब्रिटनमधील आपल्या मनुष्यबळात कपात केली आहे. या भागातील २,५०० कर्मचारी कमी करण्यात आले आहेत. कंपनीचे ब्रिटनसह आयर्लँन्डमध्ये १५,५०० कर्मचारी आहेत. कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण १६ टक्के आहे. व्यवसाय पुर्नरचनेचा भाग म्हणून हा निर्णय घेतला गेला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या ब्रिटनमधील व्यवसायाची पुर्नबांधणी प्रक्रिया कायम राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. कंपनीने कमी केलेले हे कर्मचारी कायमस्वरुपी तत्त्वावर किरकोळ व्यवसाय क्षेत्रातील आहेत. कंपनीने विक्री दालनांची संख्या कमी केल्याने हा परिणाम साधला गेला आहे. कंपनीने दोनच दिवसांपूर्वी आपला फ्रान्समधील तोटय़ातील व्यवसाय विकला आहे.
‘थॉमस कूक’ची ब्रिटनमध्ये कर्मचारी कपात
आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रातील आघाडीच्या थॉमस कूकने ब्रिटनमधील आपल्या मनुष्यबळात कपात केली आहे. या भागातील २,५०० कर्मचारी कमी करण्यात आले आहेत. कंपनीचे ब्रिटनसह आयर्लँन्डमध्ये १५,५०० कर्मचारी आहेत. कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण १६ टक्के आहे.
First published on: 07-03-2013 at 12:06 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thomas cook to cut 2500 jobs in uk