नुकत्याच शेजारच्या गुजरात राज्यात शिरकाव करणाऱ्या आणि येत्या महिन्यात कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये शाखा सुरू करणाऱ्या ‘टीजेएसबी’ने चालू आर्थिक वर्षांत नव्या २४ शाखा सुरू करण्याचा संकल्प सोडला आहे. ‘टीजेएसबी’च्या महाराष्ट्रासह गोवा, गुजरात आणि कर्नाटकात ८१ शाखा आहेत. यंदा सलग तिसऱ्या वर्षी १० एप्रिलपूर्वी वित्तीय निष्कर्ष जाहीर करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत, बँकेचे अध्यक्ष विद्याधर वैशंपायन, उपाध्यक्ष भा. वा. दाते व मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश उतेकर उपस्थित होते. टीजेएसबीच्या नफ्यात २०१२-१३ आर्थिक वर्षांत तब्बल २५ टक्के वाढ होऊन तो ७५ कोटी रुपयांहून अधिक राहिला आहे. बँकेने गेल्या आर्थिक वर्षांत रु. ८,७०९ कोटींचा एकूण व्यवसाय केला, त्यात रु. ५,३०९ कोटी ठेवी व रु. ३,४०० कोटी कर्जे आहेत.
‘टीजेएसबी’च्या लवकरच नव्या २४ शाखा
नुकत्याच शेजारच्या गुजरात राज्यात शिरकाव करणाऱ्या आणि येत्या महिन्यात कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये शाखा सुरू करणाऱ्या ‘टीजेएसबी’ने चालू आर्थिक वर्षांत नव्या २४ शाखा सुरू करण्याचा संकल्प सोडला आहे. ‘टीजेएसबी’च्या महाराष्ट्रासह गोवा, गुजरात आणि कर्नाटकात ८१ शाखा आहेत.
First published on: 16-04-2013 at 02:27 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tjsb bank will open 24 new branch in current financial year