सलग तिसऱ्या व्यवहारात तेजी नोंदविताना मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने मंगळवारी गेल्या ११ सप्ताहांचा नवा उच्चांक गाठला. ४५.१२ अंशवाढीसह सेन्सेक्स २५,३३०.४९ वर पोहोचला, तर १०.६५ अंशवाढीने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीला ७,७०० वर, ७,७१४.९० पर्यंत स्थिरावता आले.
गेल्या दोन व्यवहारांत मुंबई निर्देशांकांत ६०८ अंशांची वाढ नोंदली गेली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडून येणाऱ्या पतधोरणात किमान पाव टक्का व्याजदर कपातीच्या आशेवर भांडवली बाजारातील विदेशी गुंतवणूकदार संस्थांचा रस पुन्हा वाढला आहे. बाजारात दुपारच्या सत्रात वरच्या टप्प्यावर पोहोचलेल्या निर्देशांकामुळे नफेखोरीचे वातावरण निर्माण झाले होते.
दिवसअखेर किरकोळ तेजी नोंदविणाऱ्या मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्समध्ये भेल, हिरो मोटोकॉर्प, टाटा स्टील, महिंद्र अ‍ॅन्ड मिहद्र, एचडीएफसी, टीसीएस, रिलायन्स यांचे मूल्य वाढले, तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता सर्वाधिक २.६८ टक्क्य़ांनी उंचावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा