सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची बुडीत कर्जाच्या वाढत्या प्रमाणाबद्दल गंभीर चिंता व्यक्त करीत अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी प्रत्येक सरकारी बँकांमधील बडय़ा ३० कर्ज थकबाकीदारांच्या सूचीवर आपली करडी नजर असल्याचे पुन्हा स्पष्ट केले. या बडय़ा थकबाकीदारांकडून वसुलीसाठी विशेष आघाडी उघडून प्रयत्न करण्याचे त्यांनी सरकारी बँकांच्या प्रमुखांना सुचविले.
बँकांची अनुत्पादित कर्ज-मालमत्ता अर्थात एनपीए हे अर्थव्यवस्थेचेच फलित आहे आणि अर्थव्यवस्थेत वाढीची स्थिती जसजशी सुधारेल, तसतशी बँकांच्या एनपीएचे प्रमाणही कमी होईल, असे नमूद करीत अर्थमंत्री चिदम्बरम यांनी ‘‘प्रत्येक बँकेच्या क्षेत्रवार अव्वल ३० अनुत्पादित कर्ज खात्यांवर आपली नजर आहे आणि प्रामुख्याने मोठे कर्जदार (एक कोटी रुपयांहून अधिक कर्ज) असलेल्यांमध्ये कर्ज-बुडितांचे प्रमाण अधिक असणे ही बाब चिंताजनक आहे,’’ असे सांगितले.
राजधानी दिल्लीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांबरोबर झालेली बैठक संपवून बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चिदम्बरम यांनी सद्य:स्थिती ही २००० सालापेक्षा वाईट नसल्याचेही स्पष्ट केले.
२००० सालात एनपीएचे प्रमाण एकूण वितरित कर्जाच्या १४ टक्क्य़ांवर पोहोचले होते. अर्थव्यवस्थेच्या विकासाला ओहोटी लागत चालली असताना, एनपीएचे प्रमाणही वाढत चालले आहे. जून २०१३ अखेर सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकीत कर्जाचे प्रमाण एकूण वितरित कर्जाच्या ३.८९ टक्के, तर स्टेट बँक समूहात हेच प्रमाण ५.५० टक्के असे होते. स्टेट बँकेप्रमाणे अन्य सरकारी बँकांनीही थकीत कर्जाच्या वसुलीसाठी विशेष तयारी करण्याची सूचनाही चिदम्बरम यांनी केली. बँकांनी वरिष्ठ श्रेणीचा शक्य तो महाव्यवस्थापक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात बुडीत खाती जमा केलेल्या कर्जदारांकडून वसुलीसाठी विशेष विभाग कार्यान्वित करायला हवा, असे त्यांनी सुचविले.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे बडे ३० कर्जबुडवे अर्थमंत्र्यांच्या रडारवर!
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची बुडीत कर्जाच्या वाढत्या प्रमाणाबद्दल गंभीर चिंता व्यक्त करीत अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी प्रत्येक सरकारी बँकांमधील बडय़ा ३० कर्ज थकबाकीदारांच्या सूचीवर आपली करडी नजर असल्याचे पुन्हा स्पष्ट केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-10-2013 at 12:31 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top npa accounts of banks on finmin radar