टोयोटाच्या इटिऑस आणि इटिऑस लिवा या दोन कार नुकत्याच पुण्यात सादर करण्यात आल्या. डीएसके टोयोटाचे व्यवस्थापकीय संचालक शिरिष कुलकर्णी, टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या महाराष्ट-गोवा राज्याचे विक्री प्रमुख विनोद ललवाणी यावेळी उपस्थित होते. नव्या इटिऑसची किंमत ५.४५ ते ७.०९ लाख (एक्स शोरुम, नवी दिल्ली) (पेट्रोल) व ६.७० ते ८.१५ लाख रुपये (डिझेल) आहे. तर इटिऑस लिवाची किंमत ४.४६ ते ५.९९ लाख (एक्स शोरुम, नवी दिल्ली) (पेट्रोल) व ५.७२ ते ६.३८ लाख रुपये (डिझेल) आहे. डीएसके टोयोटाच्या महाराष्ट्रातील ९ दालनांमध्ये तर पुण्यातील ३ दालनांमध्ये उपलब्ध आहेत. शहरातील हडपसर येथील अडिच लाख चौरस फूट क्षेत्रफळावरील दालन हे आशिया खंडातील सर्वात मोठे दालन आहे.
टोयोटाच्या इटिऑस, इटिऑस लिवा पुण्यात सादर
टोयोटाच्या इटिऑस आणि इटिऑस लिवा या दोन कार नुकत्याच पुण्यात सादर करण्यात आल्या. डीएसके टोयोटाचे व्यवस्थापकीय संचालक शिरिष कुलकर्णी, टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या महाराष्ट-गोवा राज्याचे विक्री प्रमुख विनोद ललवाणी यावेळी उपस्थित होते.
First published on: 15-03-2013 at 12:05 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toyotas etios etios liva present in pune