टोयोटाच्या इटिऑस आणि इटिऑस लिवा या दोन कार नुकत्याच पुण्यात सादर करण्यात आल्या. डीएसके टोयोटाचे व्यवस्थापकीय संचालक शिरिष कुलकर्णी, टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या महाराष्ट-गोवा राज्याचे विक्री प्रमुख विनोद ललवाणी यावेळी उपस्थित होते. नव्या इटिऑसची किंमत ५.४५ ते ७.०९ लाख (एक्स शोरुम, नवी दिल्ली) (पेट्रोल) व ६.७० ते ८.१५ लाख रुपये (डिझेल) आहे. तर इटिऑस लिवाची किंमत ४.४६ ते ५.९९ लाख (एक्स शोरुम, नवी दिल्ली) (पेट्रोल) व ५.७२ ते ६.३८ लाख रुपये (डिझेल) आहे. डीएसके टोयोटाच्या महाराष्ट्रातील ९ दालनांमध्ये तर पुण्यातील ३ दालनांमध्ये उपलब्ध आहेत. शहरातील हडपसर येथील अडिच लाख चौरस फूट क्षेत्रफळावरील दालन हे आशिया खंडातील सर्वात मोठे दालन आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in