युनायटेड स्पिरिट्समध्ये गैरव्यवहार झाल्याचा डिआज्जिओने दावा केल्यानंतर कंपनीचे अध्यक्ष व संचालक डॉ. विजय मल्ल्या प्रवर्तक असलेल्या यूबी समूहातील सर्वच कंपन्यांवर चौकशीचा भिंग फिरण्याची चिन्हे आहेत.
मल्ल्या यांच्याकडून यूनायडेट स्पिरिट्समधील ५४ टक्के हिस्सा खरेदी करणाऱ्या ब्रिटनच्या डिआज्जिओने या व्यवहारात गैर व्यवहार झाल्यासह कंपनीतील पैसा अन्यत्र वळविल्याचा ठपका ठेवला आहे. परिणामी दोन कंपन्यांमधील कॉर्पोरेट युद्ध सुरू झाल्याचे मानले जात आहे.
यानुसार यूबी समूहातील (यूनायटेड ब्रेव्हेरेज) यूनायटेड स्पिरिट्स तसेच अन्य उपकंपन्या, त्यातील वरिष्ठ अधिकारी, लेखापरिक्षक, प्रवर्तक यांच्यासह मल्ल्या यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चौकशी यंत्रणा यूनायटेड स्पिरिटमधील २०१० ते २०१३ मधील व्यवहारही तपासून पाहणार असल्याचे सांगण्यात येते.
डिआज्जिओने शनिवारी याबाबत अंतर्गत चौकशी सुरू असल्याचे जाहिर करत कंपनीचे ज्येष्ठ अधिकारी पी. ए. मुरली यांनी गेल्याच आठवडय़ात राजीनामा दिला होता. गेल्या वर्षांपर्यंत कंपनीचे लेखापरिक्षण प्राईसवॉटरहाऊसकूपर्स (पीडब्ल्यूसी) पाहत होती.
ब्रिटनच्या डिआज्जिओने मल्ल्या यांच्या यूनायटेड स्पिरिट्समधील  हिस्सा खरेदीस जुलै २०१३ पासून प्रारंभ केला. अखेर वर्षभरानंतर निम्म्या हिश्यासह कंपनीची मालकी आघाडीच्या मद्य उत्पादक कंपनीवर प्रस्थापित झाली. यानंतर मल्ल्या यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र मल्ल्या यांनी त्याला विरोध केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यूबी संबंधित समभागांमध्ये आपटी
व्यापार प्रतिनिधी, मुंबई   
यूनाटेड स्पिरिट-डिआज्जिओ वादात अध्यक्ष व संचालक विजय मल्ल्या यांच्याशी संबंधित यूबी समूहातील (यूनायटेड ब्रेव्हरेज) सर्वच कंपन्यांचे समभाग सोमवारी भांडवली बाजारात कमालीचे आपटले. यामध्ये किंगफिशर एअरलाईन्सचाही समावेश राहिला. बाजारात सूचिबद्ध व गैर व्यवहाराच्या चर्चेत अडकलेल्या यूनायटेड स्पिरिट्सचा समभाग व्यवहारात ३.८ टक्क्य़ांपर्यंत तर यूनायटेड ब्रेव्हरेजेसचे समभाग मूल्य तब्बल १२.१८ टक्क्य़ांपर्यंत घसरला. यूबी होल्डिंगही ४.४६ टक्क्य़ांनी घसरला होता.
सध्या सुरू असलेल्या गैर व्यवहाराच्या चर्चेबाबत डिआज्जिओबरोबर चर्चा करण्यात येईल. मी कंपनीच्या संचालक मंडळावर राहण्याबाबत डिआज्जिओने आक्षेप घेतला आहे. अध्यक्ष व संचालक या नात्याने त्यांना मी नको आहे. त्यासाठी भागधारकांची सभा घ्यायची अथवा त्यांची मान्यता मिळवायची का, याबाबत मी आता काही सांगू शकणार नाही.  
६    विजय मल्ल्या, अध्यक्ष, युनायटेड स्पिरिट्स.
युनायटेड स्पिरिट्स        रु. ३,२९४.३५ (-३.४९%)
युनायटेड ब्रेव्हरेज लिमिटेड    रु. ९३५.८५ (-१२.१८%)
युनायटेड ब्रेव्हरेज (हो) लि.    रु. २०.३५ (-४.४६%)
किंगफिशर एअरलाईन्स    रु. १.७७ (-४.३२%)

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ub entities others under multi agency scanner