भारतातील प्रमुख कॅब कंपनी उबर इंडियाने देशांतर्गत व्यवसाय विस्तार कार्यक्रमांतर्गत एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. कंपनीने यामाध्यमातून आपले २०१६ पर्यंतचे दोन लाख रोजगार व २०२० पर्यंत ५० हजार महिलांना रोजगार देण्याचे निश्चित केले आहे.
भौगोलिक रचनेच्या बाबतीत उबेरसाठी भारतातील बाजारपेठ अमेरिकेबाहेरची सर्वाíधक मोठी बाजापेठ आहे. उबरचा दरमहा ४० टक्के दराने उबरचा विकास होत आहे. उत्पादने, कर्मचारी भरती आणि पेमेंट सोल्युशनसाठी अधिक गुंतवणूक केल्यानंतर विकास आणखी वेगाने होईल असा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे. नवी गुंतवणूक आणि विकासाचा वाढता दर लक्षात घेता येत्या सहा ते नऊ महिन्यात प्रतिदिन १० लाख फेऱ्या करू, असा विश्वास कंपनीचे अध्यक्ष अमित जैन यांनी व्यक्त केला आहे.
जैन म्हणाले की, भारतीय बाजारपेठेत उबरचा दमदार विकास होत असून आणखी विकास करण्याची उबरची क्षमता आहे. चीन आणि भारतीय बाजापेठेस उबरचे प्राधान्य आहे. यापुढील नऊ महिन्यात भारतात आणखी एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे आश्वासन आम्ही देत आहोत. यामुळे नव्या शहरांमध्ये उबरच्या सेवा सुरु करता येतील. या गुंतवणुकीमुळे येत्या सहा ते नऊ महिन्यांत आम्ही प्रतिदिन १० लाख फेऱ्या करू, असेही जैन यांनी सांगितले.
येत्या २० महिन्यात उबेरने देशातील आणखी १८ शहरांमध्ये सेवा विस्तारित करण्याचे तसेच विविध वित्त सेवा देण्याची भारतातून सुरुवात केल्याचे सांगण्यात आले आहे. २०१६ पर्यंत उबर भारतातील दोन लाख लोकांना रोजगार देणार असून २०२० पर्यंत ५० हजार महिलांनाही रोजगार उपलब्ध करून देणार आहोत, असे आश्वासन कंपनीने दिले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा