रशिया युक्रेन संघर्षाचा परिणाम सध्या जगभर पाहायला मिळत आहे. युद्धामुळे शेअर बाजारापासून क्रूड ऑईलपर्यंत स्थिती बिकट दिसत आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क देखील यातून सुटू शकलेले नाहीत. तिसर्या महायुद्धाकडे संकेत देत असलेल्या परिस्थितीमुळे जगभरातील शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळे जगातील अब्जाधीशांच्या संपत्तीतही घट होताना दिसत आहे. यामुळे, आता एलॉन मस्क यांच्या संपत्तीत २०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त घट झाली आहे.
एलॉन मस्कची संपत्ती ३०० अब्ज डॉलरच्या पुढे होती. बुधवारी, मस्कला १३.३ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आणि त्यांची एकूण संपत्ती १९८.६ अब्ज डॉलरवर आली. पण यानंतरही टेस्लाचे व्यवस्थापकीय संचालयक असलेले मस्क अजूनही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पूर्व युक्रेनमध्ये लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर जगातील शेअर बाजारात मोठी घसरण झाली. ज्याचा परिणाम जगातील श्रीमंत लोकांच्या संपत्तीवरही झाला. एलॉन मस्कची कंपनी टेस्लाचे शेअर्स सात टक्क्यांनी घसरले. दुसरीकडे, अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांचीही हीच परिस्थिती होती. अॅमेझॉनचा शेअर ३.५ टक्क्यांनी घसरला. त्यानंतर जेफ बेझोस यांची संपत्ती ५ अब्ज डॉलरने कमी होऊन १६९ अब्ज डॉलर झाली.
जगभरातील शेअर बाजारातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सलग चौथ्या दिवशी टेस्लाच्या शेअर्समध्ये घसरण झाली.त्यामुळे टेस्लाचा शेअर सप्टेंबरनंतरच्या नीचांकी पातळीवर गेला. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, या वर्षाच्या सुरुवातीपासून शेअर बाजारांमध्ये घसरण दिसून येत आहे, ज्यामुळे मस्कचे १ जानेवारीपासून ७१.७ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबर रोजी एलॉन मस्कची एकूण संपत्ती ३४०. अब्ज डॉलर होती.
युक्रेन आणि रशिया यांच्यातील वादात केवळ मस्क यांनाच शेअर बाजारांच्या घसरणीचा फटका बसला आहे असे नाही. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस या वर्षी आतापर्यंत २२.९ अब्ज डॉलरच्या तोट्यात आहेत. त्याच वेळी, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बर्नार्ड अरनॉल्ट यांनी २२.५ अब्ज डॉलर गमावले.