काँग्रेसप्रणीत ‘संयुक्त पुरोगामी आघाडी’ सरकारने गेल्या १० वर्षांत राबविलेल्या शालेय व उच्च शिक्षण क्षेत्रातील सुधारणांचे धोरणच २०१४ च्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने भाजपप्रणीत एनडीए सरकारने पुढे नेले आहे. शिक्षणाच्या संदर्भात या अर्थसंकल्पातील सर्वात आकर्षक घोषणा म्हणजे १० राज्यांत मिळून एकेक या प्रमाणे दहा आयआयटी-आयआयएम या केंद्रीय शिक्षणसंस्था सुरू करण्याची. त्यापैकी एक आयआयएम महाराष्ट्राच्याही वाटय़ाला येणार आहे. पण, गेल्या चार-पाच वर्षांत सुरू झालेल्या आयआयटी आणि आयआयएमची अवस्था पाहता ही घोषणा गाजरच ठरण्याची शक्यता जास्त आहे.
देशात सध्या १६ आयआयटी आणि १३ आयआयएम आहेत. परंतु, यापैकी जुन्या पाच आयआयटी-आयआयएम वगळता उर्वरित संस्थांमध्ये प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल नाही. याला कारण या नव्या संस्थांमध्ये शिक्षक, पायाभूत सुविधा यांची वानवा. नव्याने येणाऱ्या संस्थांचीही अवस्था अशीच राहणार असल्यास या नव्या केंद्रीय संस्थांची घोषणा हे गाजरच ठरण्याची शक्यता अधिक आहे.
अस्तित्वात असलेल्या संस्थांचा दर्जा सुधारण्याऐवजी केवळ आयआयटी-आयआयएमच्या संख्येत भर घातल्याने त्याचा उच्चशिक्षण क्षेत्राला फायदा होईल का, याचा विचार व्हायला हवा होता. गेल्या पाच वर्षांत सुरू करण्यात आलेल्या पाच आयआयटी-आयआयएममधील शिक्षकांच्या कित्येक जागा आजही रिक्त आहेत. कारण, या संस्थांमध्ये जाण्यास शिक्षक तयार नाहीत. तर विद्यार्थी न मिळाल्याने या संस्थांमधील जागा तीन-तीन प्रवेश फेऱ्यांनंतरही रिक्त राहात आहेत.
महत्त्वाचे म्हणजे या दहाही संस्थांकरिता मिळून करण्यात आलेली केवळ ५०० कोटींची तरतूद यापैकी एकाही संस्थेसाठी पुरणारी नाही. कारण, एक आयआयटी सुरू करायला सुमारे १७५० कोटी रुपये लागतात. तर आयआयएमकरिता किमान १००० कोटी. भविष्यात इतके पैसे कुठून आणणार याचे उत्तर अर्थसंकल्पात नाही.
शिक्षण क्षेत्रासाठी घोषणा अनेक पण अंमलबजावणीचे काय?
काँग्रेसप्रणीत ‘संयुक्त पुरोगामी आघाडी’ सरकारने गेल्या १० वर्षांत राबविलेल्या शालेय व उच्च शिक्षण क्षेत्रातील सुधारणांचे धोरणच २०१४ च्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने भाजपप्रणीत एनडीए सरकारने पुढे नेले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-07-2014 at 04:32 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union budget 2014 education sector