अर्थसंकल्प सादर करताना लोकसभा अध्यक्षांकडे पाच मिनिटांची अल्पविश्रांती मागणारे अरुण जेटली हे देशाचे पहिलेवहिले अर्थमंत्री ठरले आहेत.. यामागे पाठीचे दुखणे हे वैयक्तिक कारण असावे, अशी अटकळ अनेकजण बांधत आहेत आणि हे कारण खरोखरच खासगी असल्याने त्याची जाहीर चर्चा योग्यही नाही..
..परंतु याच विरामाबद्दल आणखी एक कुजबुज मात्र सेन्सेक्सच्या आकडय़ांशी संबंधित आहे. जेटली हे पूर्वलक्ष्यी कर रद्द करण्याऐवजी त्याचे खटले नीट चालवू म्हणत होते, पुढे १०० कोटींच्या काही सामाजिक योजना जाहीर करून मनरेगाही राहणारच असे सांगत होते, तेव्हा मुंबई शेअर बाजाराच निर्देशांक (सेन्सेक्स) कोसळू लागला होता. अर्थसंकल्पाच्या आधीपासून २५४०० च्या वर असलेला हा निर्देशांक जेटलींनी अर्थसंकल्पीय भाषण सुरू केल्यापासून अध्र्या तासात, ११ वाजून ३४ मिनिटांनी २५, २८४ अंकांवर आला होता. ही घसरण ११ वाजून ३९ व्या मिनिटाला २५ हजार १४४ वर गेली. म्हणजे त्या पाच मिनिटांत सेन्सेक्स १४४ अंकांनी घसरला होता. बरोबर एवढीच घसरण पुढल्या पाच मिनिटांत झाली असती, तर ११ वाजून ४५ मिनिटांपासून कधीही, हा निर्देशांक ‘२५ हजारांच्या खाली घसरला’ अशा बातम्या झळकू लागल्या असत्या. हे बाजाराचा नूरच निराशावादी करणारे ठरले असते.
हे सारे दूर मुंबईत घडत होते. परंतु जेटली यांनी जेव्हा विराम मागितला, तेव्हा वाजले होते ११.४६! त्या विरामानंतर सेन्सेक्स वधारू लागला, अर्थसंकल्प मांडून होता-होता तर तो अगदी ४०० अंकांनी वाढलेला दिसला आणि प्रत्यक्षात बुधवारच्या (९ जुलै) तुलनेत अर्थसंकल्पाच्या दिवशी ७२ अंकांची घटच झालेली दिसली, ती मात्र साडेतीन वाजता.. पण या साऱ्या नंतरच्या गोष्टी..
.. जेटलींचा विराम हा निव्वळ योगायोग मानावाच लागेल, पण तो योगायोग शेअर बाजाराला तात्पुरता सावरणारा ठरला, हेही नसे थोडके!
*बलशाली, विकासाच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करणारा भारत निर्माण करण्यात आपण कुठलीही कसूर ठेवणार नाही. मागील सरकारसारखा गलथान कारभार करणार नाही.
*शहरांमधील नागरिकांना अधिक चांगल्या दर्जाच्या सेवासुविधा आणि नियोजनबध्द व आधुनिक सेवासुविधांनी युक्त अशा १०० शहरांची निर्मिती.
*सीएसआर निधी झोपडपट्टय़ांच्या विकासासाठीही वापरण्याची अभिनव तरतूद मुंबईतील झोपडीधारकांसाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे.
*मुंबई शेअर बाजार निर्देशांक ४३४ अंकांनी वाढला. परदेशी गुंतवणूकदार व कंपन्यांच्या बंधपत्रावरील शिथिल केलेली नियंत्रण निर्णयांमुळे बाजार वधारला.
अर्थमंत्र्यांच्या अल्पविरामाचा योगायोग!
अर्थसंकल्प सादर करताना लोकसभा अध्यक्षांकडे पाच मिनिटांची अल्पविश्रांती मागणारे अरुण जेटली हे देशाचे पहिलेवहिले अर्थमंत्री ठरले आहेत..
First published on: 11-07-2014 at 03:50 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union budget 2014 fm arun jaitley takes break in budget session