केवळ सार्वजनिक क्षेत्रातीलच नव्हे तर एकूणच भारतीय बँकिंग क्षेत्रातील विक्रमी अनुत्पादित मालमत्तेची नोंद करणाऱ्या युनायटेड बँक ऑफ इंडियाने डिसेंबरअखेर दर्शविलेल्या वाढीव बुडित कर्जाच्या आकडय़ांना इन्फोसिसच्या सॉफ्टवेअरला जबाबदार धरले आहे. आयटी कंपनीने केलेल्या नोंदीतील त्रुटीपोटी हे आकडे फुगल्याचे बँकेने मुंबई शेअर बाजारासमोर स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बँकेला देशातील माहिती तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसचा भाग असलेल्या ‘फिनॅकल’द्वारे बँकेच्या आर्थिक व्यवहारांची नोंद (कोअर बँकिंग प्रणाली) करून दिली जाते. देशातील अन्य सार्वजनिक बँकांप्रमाणेच युनायटेड बँकही ही सेवा इन्फोसिसच्या या कंपनीकडून घेते. ही कंपनी बँकेच्या व्यवहारांची माहिती आपल्या सॉफ्टवेअरद्वारे अद्ययावत करत असते. या यंत्रणेत संबंधित कंपनीने चुकीच्या पद्धतीने माहिती संकलित केल्याचे बँकेने म्हटले आहे. कर्जदारांच्या श्रेणींची माहितीही गैरप्रकारे नोंदविली गेल्याचेही बँकेने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा