देशाच्या बिकट उद्योगस्थितीत वाहन क्षेत्रानेही यथातथा विक्रीचे आकडे नोंदवून आपला हिस्सा राखला आहे. तथापि तुलनेने मारुती, हुंदाई, होंडाची वाहन विक्री ऑगस्टमध्येही वधारलेली दिसली. तर महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, टाटा मोटर्स, टोयोटा अद्यापही घसरत्या वाहन विक्रीच्या कचाटय़ातून बाहेर पडलेले नाहीत.
देशातील पहिल्या क्रमांकाच्या मारुती सुझुकीने यंदाच्या ऑगस्टमध्ये घसघशीत ५१.६ टक्के वाहन विक्रीतील वाढ नोंदविली आहे. तिच्या मारुती ८०० सह इस्टिलो, डिझायरनेही यंदा विक्रीतील काही पटींमध्ये वाढ राखली आहे. पण बरोबर वर्षभरापूर्वी मनेसार प्रकल्पात टाळेबंदी आणि परिणामी विक्रीत लक्षणीय घसरणीच्या पाश्र्वभूमीवर ही वाढ असल्याचे लक्षात घ्यावयास हवे.  
ह्युंदाई या मूळच्या कोरियन कंपनीची तर होंडाने आजवरची सर्वाधिक वाहन विक्री यंदाच्या ऑगस्टमध्ये नोंदविली आहे. महिंद्र, टाटा, टोयोटा यांना मात्र यंदाही विक्रीत वाढ राखता आलेली नाही. दुचाकींमध्ये हीरो, होंडा यांच्या वाहन विक्रीत वाढ तर बजाज ऑटोची घसरण कायम राहिली आहे. दक्षिणेतील टीव्हीएसलाही यंदा वाढ राखण्यात यश मिळाले आहे.
कंपनी    वाढ/ घट
मारुती सुझुकी           +५१.६०%
टाटा मोटर्स                -४८.१६%
होंडा                          +६३.००%    
महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र     -१७.९०%
फोर्ड इंडिया               +२.१४%
टोयोटो किर्लोस्कर     -१४.२%
फोक्सव्ॉगन           +९.००%