भारतीय बाजारपेठेत गेल्या दोन दशकातील आयपीओसाठी (IPO) २०२१ हे वर्ष अतिशय चांगलं गेलंय. या वर्षात देखील शेअर मार्केट करोनामुळे गेल्या दोन वर्षात आर्थिक गती मंदावली होती. असं असलं तरी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचा उत्साह मात्र कायम आहे. आयपीओसाठी २०२१ हे वर्ष अतिशय चांगलं गेलं. तसंच आता २०२२ या नव्या वर्षात आयपीओमधून कंपन्यांनी १.५ लाख कोटी उभारण्यासाठी कंबर कसली आहे. या महिन्यात गौतम अदानींपासून बाबा रामदेव यांच्या कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना आणखी चांगल्या संधी मिळणार आहे.
या महिन्यात अदानींची कंपनी अडानी विल्मरचा (Adani Wilmar) आयपीओ येणार आहे. तो जवळपास ४५०० कोटींचा असेल. रुची सोयाचा जवळपास ४३०० कोटी रुपयांचा आयपीओही याच महिन्यात येणार आहे. गो एअरलाइन्स (Go Airlines) देखील जवळपास ३६०० कोटी रुपयांचा आयपीओ आणणार आहे. मोबिक्विकचा (MobiKwik) १९०० कोटी रुपयांचा आयपीओ देखील याच महिन्यात येण्याची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचा (ESAF Small Finance Bank Limited) ९९८ कोटी रुपयांचा आयपीओ आणि ट्रॅक्सन टेक्नॉलॉजीचा (Traxon Technologies) ५०० कोटी रुपयांचा आयपीओ याच महिन्यात येतील. त्यातच, स्कॅनरे टेक्नॉलॉजीजचा (Skanray Technologies) ४०० कोटी रुपयांचा आयपीओ तसेच ओएफएस असेल. तसेच ईएसडीएस सॉफ्टवेअर लिमिटेडचा (ESDS Software Limited) ३३२ कोटी रुपयांचा आयपीओ तसेच ओएफएस येणार आहे.
या वर्षी येणार एलआयसीचा आयपीओ
२०२२ मध्ये, सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC)च्या मोठ्या आयपीओसह प्राथमिक बाजारातून मोठ्या प्रमाणावर निधी उभारणी सुरु होईल. याशिवाय अनेक डिजिटल कंपन्या आयपीओ मार्केटमध्ये येण्यासाठी सज्ज आहेत. व्यवस्थापकीय संचालक आणि इक्विटी कॅपिटल मार्केट्सचे प्रमुख, वेंकटराघवन एस यांनी सांगितलं की व्याजदर वाढल्याने, सध्याच्या काळात काही प्रमाणामध्ये शिथिलता येऊ शकते. परंतु ती लक्षणीय पातळीवर राहील. तथापि, साथीच्या रोगांबाबत काही चिंता कायम आहेत. आयआयएफएल सिक्युरिटीज रिटेलचे सीईओ संदीप भारद्वाज म्हणाले की, २०२२ मध्ये आयपीओद्वारे भांडवल उभारणीचा नवा विक्रम केला जाऊ शकतो. तसेच एलआयसीचा आयपीओ जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेईल.
२०२२ मध्ये बाजारातील उत्साह कमी होणार?
दरम्यान, काही लोकांचं असंही म्हणणं आहे की २०२२ मध्ये बाजारातील उत्साह थोडा कमी होईल. प्रभुदास लिलाधर यांच्या इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट्सचे प्रमुख, पीयूष नागडा यांच्यानुसार कोविडच्या नवीन स्वरूपामुळे येत्या वर्षात बाजारातील भावनांवर परिणाम होईल आणि अशा परिस्थितीत अनिश्चिततेचा परिणाम बाजार आणि अर्थव्यवस्थेवर होत आहे. फर्स्ट वॉटर कॅपिटल फंड (IFA) एआयएफचे मुख्य प्रायोजक, रिकी कृपलानी यांनी असं म्हटलंय की २०२२ चा आयपीओ हा बाजारासाठी २०२१ प्रमाणे उत्साहवर्धक नसेल. विशेषतः पेटीएम सारख्या काही मोठ्या सार्वजनिक कंपन्यांनी सूचिबद्ध झाल्यानंतर चांगली कामगिरी केलेली नाही.