विदेशी चलन नियमभंग प्रकरणात आपल्याविरुद्ध गुन्हेगारी खटला चालवू नये अशी करण्यात आलेली विजय मल्ल्या यांची याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
जे. एस. केहर यांच्या खंडपीठाने यावेळी मद्यसम्राट मल्ल्या यांना या प्रकरणात १० लाख रुपये दंडही ठोठावला.
यूबी समूहाचे अध्यक्ष विजय मल्ल्या यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध केलेल्या याचिका प्रकरणात सर्वोच्च न्यायालायने यापूर्वी सक्तवसुली संचलनालायाला नोटीस बजाविली होती. आपल्यावरील ‘निर्ढावलेले कर्जदार’ हा ठपका पुसण्यासाठी ही याचिका करण्यात आली होती.
तपास यंत्रणा आता मल्ल्या यांनी डिसेंबर १९९५ मध्ये लंडनस्थित बेनेटॉन फॉम्र्युला लिमिटेडबरोबर केलेल्या कराराची चौकशी करणार आहे. विदेशात किंगफिशर नाममुद्रेच्या प्रसारासाठी हा करार करण्यात आला होता. यासाठी २ लाख डॉलरची रक्कम ब्रिटनच्या कंपनीला देण्यात आल्याचे कळते. रिझव्र्ह बँक तसेच विदेशी चलन व्यवहार तपासणी यंत्रणेला न कळवता हा व्यवहार झाल्याचा ठपका मल्ल्या यांच्यावर आहे.
मल्ल्या यांची याचिका फेटाळली; मद्यसम्राटाला १० लाखांचा दंडही
विदेशी चलन नियमभंग प्रकरणात आपल्याविरुद्ध गुन्हेगारी खटला चालवू नये अशी करण्यात आलेली
First published on: 14-07-2015 at 07:20 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay mallya fined rs 10 lakh as supreme court rejects plea in forex case