बँकांकडून कर्जबुडव्या असा शिक्का बसलेल्या विजय मल्या यांना युनायटेड स्पिरिट्सच्या संचालक मंडळावर फेरनिवडीस याबाबत नियुक्त सल्लागार कंपनीनेच आक्षेप घेतला आहे. मल्या यांच्या पुनर्नियुक्तीस भागधारकांनी विरोध दर्शवावा, अशी सूचना या सल्लागाराने केली आहे.
वर्षभरापासून उड्डाणे बंद असलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचे विजय मल्या हे युनायटेड स्पिरिट्स या मद्यनिर्मिती कंपनीच्या संचालक मंडळावरही आहेत. कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या ३० सप्टेंबरला आहे. कंपनीवर आता मूळच्या ब्रिटनच्या डिआज्जिओचे वर्चस्व आहे.
नव्या नेतृत्वानंतर डिआज्जिओने युनायटेड स्पिरिट्ससाठी ‘इन्स्टिटय़ुशनल इन्व्हेस्टर अॅडव्हायजरी सव्र्हिसेस’ची (आयआयएएस) सल्लागार कंपनी म्हणून नियुक्ती केली. या कंपनीने मल्या यांना संचालकपदावर पुनर्नियुक्ती करण्यास विरोध दर्शविला आहे. मल्या यांच्यावरील सध्याचा बँकांचा कर्जबुडवेपणाचा ठपका यासाठी कारणीभूत ठरला आहे. जोपर्यंत हे प्रकरण निस्तरले जात नाही तोपर्यंत कंपनीला निधी उभारणी बिकट होईल, असे मत या सल्लागार कंपनीने व्यक्त केले आहे.
मल्यांच्या पुनर्नियुक्तीस विरोध
बँकांकडून कर्जबुडव्या असा शिक्का बसलेल्या विजय मल्या यांना युनायटेड स्पिरिट्सच्या संचालक मंडळावर फेरनिवडीस याबाबत नियुक्त सल्लागार कंपनीनेच आक्षेप घेतला आहे.
First published on: 20-09-2014 at 04:08 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay mallya should not continue on united spirits board of director