बँकांकडून कर्जबुडव्या असा शिक्का बसलेल्या विजय मल्या यांना युनायटेड स्पिरिट्सच्या संचालक मंडळावर फेरनिवडीस याबाबत नियुक्त सल्लागार कंपनीनेच आक्षेप घेतला आहे. मल्या यांच्या पुनर्नियुक्तीस भागधारकांनी विरोध दर्शवावा, अशी सूचना या सल्लागाराने केली आहे.
वर्षभरापासून उड्डाणे बंद असलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचे विजय मल्या हे युनायटेड स्पिरिट्स या मद्यनिर्मिती कंपनीच्या संचालक मंडळावरही आहेत. कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या ३० सप्टेंबरला आहे. कंपनीवर आता मूळच्या ब्रिटनच्या डिआज्जिओचे वर्चस्व आहे.
नव्या नेतृत्वानंतर डिआज्जिओने युनायटेड स्पिरिट्ससाठी ‘इन्स्टिटय़ुशनल इन्व्हेस्टर अॅडव्हायजरी सव्र्हिसेस’ची (आयआयएएस) सल्लागार कंपनी म्हणून नियुक्ती केली. या कंपनीने मल्या यांना संचालकपदावर पुनर्नियुक्ती करण्यास विरोध दर्शविला आहे. मल्या यांच्यावरील सध्याचा बँकांचा कर्जबुडवेपणाचा ठपका यासाठी कारणीभूत ठरला आहे. जोपर्यंत हे प्रकरण निस्तरले जात नाही तोपर्यंत कंपनीला निधी उभारणी बिकट होईल, असे मत या सल्लागार कंपनीने व्यक्त केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा